साप किती धोकादायक असतात, हे लोक अजूनही समजून घेत नाहीत! विषारी सापांचा एक दंश मृत्यूचे कारण ठरू शकतो हे माहित असूनही काही लोक स्टंटबाजी करतात किंवा सापांना त्रास देतात. सर्पदंशामुळे अनेकांचा मृत्यू होतो तरीही लोक सुधारत नाही. अशावेळी सापांना न घाबरता त्यांना पकडणारे आणि त्यांना जंगलात सोडणारे सर्पमित्र नेहमीच जीवाची बाजी लावून मदतीला धावून येतात. पण सर्पमित्राची एक चूक त्याच्या जीवावर बेतली आहे. अशीच एक खळबळजनक घटना समोर आली आहे. एक सर्पमित्र ज्यांनी हजारो सापांना वाचवले त्यांचाच मृत्यू एका विषारी सापाच्या दंशामुळे झाला. विशेष म्हणजे, मृत्यूपूर्वीचा त्यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो सर्पमित्र गळ्यात कोबरा साप गुंडाळूनन बाइक चालवताना दिसत होते.
मध्य प्रदेशातील गुना जिल्ह्यातून एक दुःखद बातमी येत आहे. येथे एक सर्पमित्र गळ्यात विषारी कोबरा साप गुंडाळून दुचाकीवरून जात होता, अचानक त्याला सापाने दंश केला आणि तो त्याचा मृत्यू झाला. त्या माणसाचे नाव दीपक महावार आहे, असे सांगितले जात आहे. त्याने आतापर्यंत शेकडो सापांचे प्राण वाचवले आहेत. ज्यांनी आजवर लोकांना सापांपासून वाचवलं, जे स्वतः सापांवर नियंत्रण ठेवण्यात पटाईत होते, त्यांनीच गळ्यात जिवंत कोबरा सापाने गुंडाळण्याची घातक चूक केली आणि त्याची किंमत त्यांना आपल्या प्राण गमावून चुकवावी लागली. दीपक यांना साप चावल्यानंतर तत्काळ रुग्णालयात नेण्यात आलं, परंतु उपचारात उशीर झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.
घटनेच्या दिवशी, दीपक आपल्या मुलांना शाळेतून सोडत असताना साप गळ्यात हार घातल्यासारखा गुंडाळला होता. त्यानंतर साप अचानक त्यांना चावला. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, जिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्याला अँटीव्हेनम देण्यात आले असले तरी वैद्यकीय मदत मिळण्यास उशीर झाल्यामुळे त्याचा कोणताही परिणाम झाला नाही. दीपकचे दोन मुलं, रौनक (१२) आणि चिराग (१४) आता अनाथ झाले आहेत. त्याची पत्नी आधीच निधन झाले होते या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. लोक म्हणतात की,”सापांची चेष्टा करणे योग्य नाही, जरी ते सर्पमित्र असले तरी सापच त्यांना चावला.” सापांशी मैत्री किंवा शत्रुत्व करू नये. असेही काही लोक म्हणतात.