Snake shocking video: सोशल मीडियावर सापांचे अनेक व्हिडीओ रोज व्हायरल झाले आहेत. साप हा शब्द जरी उच्चारला तरी अंगावर काटा येतो. साप हा असा सरपटणारा प्राणी आहे जो कधीही कुठेही लापून बसू शकतो. गावात किंवा जंगलाच्या आजूबाजूला असलेल्या मानवी वस्तीत साप हमखास पाहायला मिळतात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना सापाची भीती वाटते. सोशल मीडियावर सापाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ पाहून अंगावर शहारा येतो. सध्या असाच एक सापाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पावसाळ्याच्या दिवसांत घरात साप घुसणे, ग्रामीण भागात रात्रीच्या वेळी अंथरुणात साप येणे किंवा अगदी आपण रस्त्याने जात असताना सापाने अचानकपणे आपल्याला दंश करणे हे सामान्य आहे. मात्र एखाद्या व्यक्तीच्या कानात साप गेल्याचे आपण विशेष कधी ऐकले नसेल. साप अंगावर चढणे किंवा सापाने विळखा घालणे हे कदाचित आपण वाचून किंवा ऐकून असतो. पण अशाप्रकारे सापाने कानात शिरणे ही गोष्ट आपण कधी ऐकली नसेल. ऐकूनच अंगावर काटा येतो मात्र असा हा प्रकार प्रत्यक्षात घडला आहे आणि त्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.हा थरारक व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल.

साप म्हटले की आपण काहीसे घाबरुन जातो. त्यामुळे तो आपल्या आसपास येणे आणि थेट कानात शिरणे तर किती भितीदायक किंवा घृणा वाटणारे असेल याचा कदाचित आपण अंदाजही लावू शकणार नाही. हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला असून यामध्ये एका महिलेचा कान आणि त्यामध्ये अडकलेला साप आपल्याला दिसू शकतो.हा अडकलेला साप बाहेर काढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. मात्र काही केल्या तो बाहेर यायचे नाव घेत नसल्याचेही दिसते.

पाहा व्हिडीओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ही घटना नेमकी कुठे आणि कोणासोबत घडली हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही. कारण व्हिडिओमध्ये केवळ एका महिलेचा कान आणि हात दिसत आहेत. मुख्य म्हणजे हा साप मागच्या दिशेने आत गेलाच कसा असा प्रश्नही आपल्याला पडू शकतो. सोशल मि़डियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला असून लोक त्यावर बऱ्याच प्रतिक्रियाही देताना दिसत आहेत. शेवटी साप बाहेर आला की नाही, कसा आला हे मात्र व्हिडिओमध्ये दिसत नाही.