Snakes Shocking Video : पावसाळ्यात साप अनेकदा रस्त्यावर, तर कुठे मानवी वस्तीत फिरताना दिसतात. कधी नांगरणी करताना शेतातही साप नजरेस पडतात. पण विचार करा, मुसळधार पावसात शेतीत काम करत असताना नजर जाईल तिथपर्यंत फक्त शेकडो साप जर नजरेस पडले तर? विचार करूनच धडकी भरली ना; पण सध्या असा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. ज्यात शेतात प्रचंड चिखल आहे आणि त्या चिखलात दूर नजर जाईल तिथपर्यंत फक्त सापच साप दिसतायत. शेताच्या मध्यभागी जेसीबी उभ्या आहेत; पण त्या या सापांमुळे पुढे जाऊ शकत नाहीत.
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, शेतात जेसीबी उभ्या आहेत आणि तिथेच शेकडो साप इथून तिथे उड्या मारत आहेत. इतक्या मोठ्या संख्येने साप तुम्ही शेतात बाहेर येताना क्वचितच पाहिले असतील. हे दृश्य फारच भयानक आहे. कारण- नजर जाईल तिथपर्यंत फक्त सापच साप दिसतायत; पण व्हिडीओतील दृश्य खरे वाटत असले तरी ते एआयद्वारे एडिट केले गेले आहे. दरम्यान, सोशल मीडियावर व्ह्युज आणि लाइक्ससाठी हा व्हिडीओ शेअर केला गेला आहे.
सापाचा हा धडकी भरवणारा व्हिडीओ mgtc_farming नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. ज्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘जेसीबीने शेतातून इतके साप का रेस्क्यू केले जात आहेत? हा व्हिडीओ आतापर्यंत अनेकांनी पाहिला आणि त्यावर वेगवेगळ्या कमेंट्स केल्या आहेत. काहींनी म्हटले की, हा एक एआय एडिट केलेला व्हिडीओ आहे, तर काहींनी, “हा व्हिडीओ खरा आहे की खोटा? मला समजत नाही”, प्रश्न उपस्थित केला. त्याचप्रमाणे एका युजरने विनोदाने लिहिले, “इतके एडिटिंग करू नको भाऊ, नाही तर मला इन्स्टाग्राम डिलीट करावे लागेल.”