Snake Viral Video : जगभरात सापांच्या अनेक प्रजाती आढळतात. त्यात किंग कोब्रा ही सर्वांत विषारी प्रजाती मानली जाते. या सापाच्या दंशाने काही मिनिटांत माणसाचा मृत्यू होऊ शकतो. म्हणून केवळ माणूसच नाही, तर अनेक महाकाय प्राणीदेखील किंग कोब्रापासून अंतर ठेवून राहतात. पण हिंदू धर्मात नागाला देव मानले जाते. त्यामुळे लोक त्याला मारत नाहीत; तर त्याची पूजा करतात. पण, तो दंश करेल या भीतीने ते त्याची लांबूनच पूजा करतात. मात्र, नदीकिनारी एका महिलेने पूजा करीत असताना किंग कोब्राला उचलून घेतलं अन् असं काही केलं की, ते पाहून तुम्हालाही धक्का बसेल.

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एक महिला नदीकिनारी आरामात बसून पूजा करीत होती, यावेळी मागून एक मोठा किंग कोब्रा सरपटत फणा वर करून, तिच्या अगदी जवळ येऊन बसतो. सापाला पाहताच महिला पूजा सोडून पटकन उठून उभी राहते. मग ती नागाला हात लावून नमस्कार करते. पण एवढ्यावरच ती थांबत नाही, ती पुढे त्या नागाची हालचाल समजून घेत, त्याला सरळ उचलून गळ्यात टाकते. व्हिडीओतील महिलेचे धाडस पाहून सगळेच नेटकरी चकित झाले.

नागाचा हा व्हिडीओ successdiary025 नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे, ज्यावर लोक वेगवेगळ्या कमेंट्स करीत आहेत. व्हिडीओवर कमेंट करीत एका युजरने लिहिले, “एक महिला काय करू शकते याचे हे उत्तम उदाहरण आहे.” दुसऱ्या युजरने म्हटले, “येथे असेच असते.” तिसऱ्या युजरने लिहिले, “दोन्ही बहिणी एकत्र खूप आनंदी दिसत आहेत.” शेवटी एकाने मिश्कील कमेंट करीत म्हटले, “संपूर्ण नागा समुदायात भीतीचे वातावरण आहे.”