विज्ञान आणि तंत्रज्ञानाने एवढी प्रगती केली आहे की याच्या साहाय्याने मनुष्य कोणतीही गोष्ट साध्य करू शकतो. आपण विमान, हेलिकॉप्टर पॅराशूटच्या साहाय्याने अनेकांना उडताना पाहिलं असे. पण नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे यात एक जवान समुद्रातून भगवान हनुमानासारखा इथून तिथे जाताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून सर्वच आश्चर्यचकित झाले आहेत.

या व्हिडीओमध्ये एक जवान समुद्राच्या मधोमध हवेत उडताना दिसत आहे. तसेच या व्हिडीओमध्ये आपल्याला एक जहाज आणि एक बोट पाण्यात तरंगताना दिसत आहे. या बोटमध्ये सैन्यातील जवान बसलेले आहेत. अचानक एक जवान आकाशात उडू लागतो. हा जवान थोडावेळ आकाशात उडून मोठ्या जहाजामध्ये स्थिरावतो. हे दृश्य चकित करणारे आहे.

हेही वाचा : Fact Check : अभिनेता सोनू सूदने काँग्रेसमध्ये केला प्रवेश? ट्विटरवर #SonuSoodWithCongress होतोय ट्रेण्ड

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आयएएस अधिकारी डॉ. एमवी राव यांनी ट्विटरवर हा विडिओ शेअर केला आहे. ‘मी असे करू शकलो असतो तर..? नक्कीच मी अनेकदा माझ्या स्वप्नात असे केले आहे.’ असे त्यांनी या ट्विटमध्ये लिहलंय. ३९ सेकंदाच्या या व्हिडीओला ५२ हजार पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत, तर ३२०० पेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलं आहे. हा व्हिडीओ पाहून अनेक वापरकर्ते मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत. एका वापरकर्त्याने म्हटलंय,’या उडणाऱ्या जवानाला बघून कलियुगात त्रेतायुगाची अनुभूती येत आहे.’