scorecardresearch

१०० वर्षांचे वडील अन् ७५ वर्षाचा मुलगा..रुग्णालयातील ‘तो’ भावनिक क्षण पाहून भारावून जाल

हा व्हिडीओ मुलगा आणि वडील यांच्यामधील प्रेमळ नात्याचा आहे. विशेष म्हणजे या व्हिडिओमधील वडिलांचे वय १०५ वर्षे तर मुलाचे वय ६७ वर्ष आहे…

father son emotional video
फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम

सोशल मीडियावर आपल्याला अनेक असे व्हिडीओ पाहायला मिळतात, जे खरंच सुंदर असतात. तर काही व्हिडीओ असे देखील असतात जे पाहून आपण भारावून जातो. सध्या एक असाच एका व्हिडीओसोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. जो पाहून तुमच्या डोळ्यात नक्की अश्रू येतील. तसंच या व्हिडिओने अनेकांच्या चेहऱ्यावर आनंद देखील आणला आहे. लोकं या व्हिडीओचं भरभरून कौतुक करत आहेत.

हा व्हिडीओ मुलगा आणि वडील यांच्यामधील प्रेमळ नात्याचा आहे. विशेष म्हणजे या व्हिडिओमधील वडिलांचे वय १०५ वर्षे तर मुलाचे वय ६७ वर्ष आहे. खरं तर आजच्या काळात काही मुलं आपल्या आई- वडिलांना घराबाहेर काढतात.अशा अनेक घटना आपण पहिल्या किंवा ऐकल्या असतीलच. पण अशा काळात देखील आपल्या वडिलांना साथ देणारा आणि त्यांची काळजी घेणारा मुलगा पाहायला मिळतोय. या व्हिडीओत मुलगा आणि वडिलांमधील एक सुंदर नातं पाहायला मिळतंय. हे दोघेही गाण्याचा आनंद घेताना आणि एकमेकांसोबत मज्जा करताना दिसत आहेत.

हा व्हिडीओ रुग्णालयातील असल्याचे दिसत आहे, ज्यामध्ये एक मुलगा आपल्या वडिलांशी बोलताना दिसत आहे. दरम्यान, तो तोंडातून शिट्टी वाजवत एक गाणं आपल्या वडिलांना आठवणीत आणून देण्याचा प्रयत्न करतो. यानंतर, तो वडिलांना विचारतो की हे कोणत्या गाण्याचे बोल आहेत. त्यानंतर त्याचे वडील काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करतात, त्यांनंतर त्यांचा मुलगा ज्यानंतर ते कोणत्या गाण्याचे बोल आहेत, हे त्यांना ऐकवून दाखवतो, त्यानंतर ही लोक एकत्र खूप हसतात. मुलगा गाणं बोलून दाखवत असताना वडिल हळूहळू ताल देत आपला हात हलवताना देखील दिसत आहेत.

( हे ही वाचा: तरुणाच्या ‘या’ व्हिडिओची सोशल मिडीयावर होतेय चर्चा; लोकं म्हणाले “हे टॅलेंट भारताबाहेर..”)

येथे पाहा व्हिडीओ

हा @goodpersonsrini नावाच्या ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, वडिलांचे वय १००वर्षे, मुलाचे ७५ वर्षे. येणारी पिढी अशी नाती जपू शकेल का? सोशल मीडियावर हा व्हिडीओ कमालीचा व्हायरल होत आहे. तसंच या व्हिडीओवर अनेकजण भरभरुन लाईक्स आणि कमेंट्स आले आहेत. लोकांना हा व्हिडीओ प्रचंड आवडला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 20-02-2023 at 16:47 IST
ताज्या बातम्या