चीनमधील वुहानमधून जगभरात पसरलेल्या करोना व्हायरसने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. चीनमध्ये या विषाणूमुळे तीन हजारहून अधिक जणांना प्राण गमवावा लागला आहे. चीनबरोबरच इतर ९० हून अधिक देशांमध्ये हा विषाणू पसरला आहे. या व्हायरसचा भारतातही शिरकाव झाला आहे. संपर्कातून करोनाची लागण होण्याचा धोका वाढत असल्यामुळे लोकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. अशातच करोना व्हायरसवर एका गाण्याची निर्मिती करण्यात आली आहे.

करोनावरील या गाण्याचे गायक आणि गीतकार रवी वाघमारे आहेत. त्यांनी या गाण्याच्या माध्यमातून लोकांचा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. चला पाहूया त्यांचे हे गाणे आहे तरी काय…

रवी यांनी त्यांच्या गाण्यातून करोना व्हायरसविषयी जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे. लोकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, तसेच ऐकमेकांशी होणारा संपर्क टाळावा असे म्हटले आहे. तसेच या गाण्याच्या माध्ममातून त्यांनी लोकांचा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.