भव्य आणि ऐतिहासिक प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर अयोध्येतील श्रीराम मंदिर हे सर्वसामान्यांसाठी खुलं करण्यात आलं आहे. अयोध्देमध्ये भक्तांची मोठी गर्दी उसळली आहे. यामध्ये अगदी लहानांपासून वयोवृध्दांपर्यंत सर्वांचा समावेश आहे. दरम्यान दक्षिण अफ्रिकेचा दिग्गज फिरकीपटू केशव महाराजने आज अयोध्येतील राम मंदीरात जाऊन प्रभू श्रीरामलल्लाचे दर्शन घेतले. यावेळी केशव महाराज भावूक झाला असून त्याला अश्रू अनावर झाले, याचाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, आफ्रिकेचा हनुमान भक्त अयोध्येत श्रीराम चरणी नतमस्तक होताच, दर्शन घेताना केशव महाराजचे डोळे पाणावले आहेत. यावेळी त्याच्या सोबत वॉशिंग्टन सुंदर, रवी बिष्णोई, जॉंटी ऱ्होड्स, जस्टिन लँगरही दर्शनासाठी उपस्थित होते.

भारतीय संस्कृतीशी मूळ असलेल्या केशव याने मंदिराचे उद्द्घाटन झाल्यानंतर तेथे जाऊन दर्शन घेण्याची इच्छा बोलून दाखवली होती. तसेच केशव महाराजने याआधीही भारतातील अनेक मंदिरांना भेट दिली आहे. केशव महाराज सध्या आयपीएलसाठी भारतात दाखल झाला आहे. केशव महाराज लखनौ संघाकडून खेळणार आहे. प्रभू श्रीरामलल्लाच्या दर्शनासाठी केशव महाराजसोबत संघाचा मुख्य प्रशिक्षक जस्टिन लँगर, फिरकीपटू रवी बिश्नोई देखील उपस्थित होते. केशव महाराज भारतीय वंशाचा असून त्याचे पूर्वज भारत सोडून दक्षिण आफ्रिकेत स्थायिक झाले. पण तरीही त्यांनी हिंदू संस्कृतीशी आपली नाळ जोडून ठेवली. केशव महाराज हा हनुमानाचा मोठा भक्त असून तो आजही भारतात आल्यावर अनेक मंदिरांना भेट देत असतो.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> वर्षाला जास्तीत जास्त पगार कसा वाढवायचा? तरुणानं सांगितल्या जबरदस्त ट्रिक्स; VIDEO एकदा पाहाच

केशव महाराजची आतापर्यंतची क्रिकेट कारकीर्द

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

केशव महाराज हा डावखुरा फिरकी गोलंदाज आहे. त्याने २००६ मध्ये दक्षिण आफ्रिकेत प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. नोव्हेंबर २०१६ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीपासून झाली. यानंतर त्याने वर्ष २०१७ मध्ये एकदिवसीय आणि त्यानंतर २०२१ मध्ये T20 आंतरराष्ट्रीय पदार्पण केले.