VIdeo Viral : सोशल मीडियावर लहान मुलांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ अतिशय मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. सध्या असाच एका चिमुकलीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ही चिमुकली चक्क भिंतीवर चढताना दिसत आहे.भिंतीवर चढण्याची तिची स्टाइल पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक चिमुकली भिंतीवर चढताना दिसत आहे. ज्याप्रकारे ती भिंतीवर चढत आहे, पाहून तुम्हाला ‘स्पायडर मॅन’ची आठवण येऊ शकते. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की सुरुवातीला ती भिंतीवर चढते आणि त्याचप्रकारे ती खाली सु्द्धा उतरते. तिचा हा व्हिडीओ पाहून कोणीही थक्क होईल. तिची ही अनोखी चढण्याची स्टाइल पाहून तुम्ही तिला ‘स्पायडर गर्ल’ म्हणू शकता.
‘स्पायडर मॅन’ हा चित्रपट लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांना आवडतो. त्यातील सुपरहिरोला चांगली पसंती मिळाली आहे. ‘स्पायडर मॅन’चे चित्रपट पाहून लहान मुलांनाही त्याच्यासारखे चढण्याची इच्छा होते. हा व्हायरल व्हिडीओ पाहून तु्म्हाला खरंच ‘स्पायडर मॅन’ची आठवण येऊ शकते.
हेही वाचा : डॅशिंग कॅट! नवरात्रीच्या पोशाखात मांजर दिसतेय आणखी गोड, व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच
anita_suresh_sharma या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “स्पायडर गर्ल” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “खूप छान” काही युजर्सनी हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.