Viral video: आपण नेहमी एकत आलो आहोत आग आणि पाणी यांच्याशी कधीही मस्ती करायची नाही, समुद्र खवळला की कधी त्याच्या पोटात सामावून घेईल हे कळतही नाही. तरीही मच्छिमार बांधव हे आपला जीव धोक्यात घालून मासेमारीसाठी जात असतात. महाराष्ट्रातले मच्छिमार बांधव हे दररोज उत्तुंग लाटांशी सामना करुन आपला जीव धोक्यात घालून आपला मच्छिमारीचा व्यवसायासाठी जीवाची बाजी लावतात. यामध्ये त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागतो, कधा चक्रीवादळ, कधी त्सुनामी, कधी भरती. दरम्यान असाच एक विशाल समुद्रातील एका वादळाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे, यावेळी समुद्रात वादळ येतं तेव्हा जहाजाची काय अवस्था होते हे पाहयला मिळालं. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल.
तुम्ही विचार करा, तुम्ही मोठ्या जहाजामध्ये आहात, हे जहाज समुद्रात काही अंतरावर जातं, मग समुद्राच्या मधोमध जात. आणि आचानक समुद्र खवळतो, वादळ येत, मोठमोठ्या लाटा उसळतात. यामध्ये तुमचं जहाज अडकतं. विचार करुनच पोटात गोळा आला ना? मग हे मच्छीमार बांधव हे त्यांचं काम कसं करत असतील याचाही विचार करा.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, जहाजाची काय अवस्था आहे, विशाल असा महासागर हवामानाच्या बदलामुळे उसळला आहे, वादळ सुरु आहे. यावेळी हे जहाज समुद्राच्या पाण्यावर लाटांप्रमाणे झुलत आहे. कधी पाण्याखाली जात आहे तर पुढच्याच क्षणी लाटांबरोबर वर येत आहे.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> धक्कादायक! शिक्षिकेनं चिमुरडीला लगावल्या ३५ कानशिलात; सीसीटीव्ही VIDEO त क्रूर वागणूक कैद…
हा व्हिडीओ viral_goshti या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला असून याला हजारो लाईक्स मिळत आहेत. तसेच नेटकरीही यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. तसेच पहिल्यांदाच समुद्रातील अशी परिस्थिती पाहून अनेकजण थक्क झाले आहेत.