Stray Dog Viral Video: शहरी गर्दीतून जाताना सुपरकारचा रुबाब असतोच. मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरात सुपरकार्स पाहायला मिळणं काही नवीन राहिलं नाही. पण कुणालाच कल्पना नव्हती की, तिच्यासमोर उभा राहणारा एक असा जीव, आज सोशल मीडियावर हीरो ठरेल म्हणून. या सुपरकारच्या माजाला जेव्हा रस्त्याच्या राजानं म्हणजेच एका भटक्या कुत्र्यानं टक्कर दिली, तेव्हा इंटरनेटवर एकच चर्चा रंगली “डोगेश भाऊंशी पंगा नाही रे!”, काय घडलं ते जाणून घ्या…
मुंबईच्या रस्त्यावर एका कुत्र्यानं जे केलं, ते पाहून लोक अक्षरशः थक्क झाले आहेत. लाखोंच्या लॅम्बॉर्गिनी गाडीचा रस्ता थांबवणारा तो सामान्य कुत्रा सध्या इंटरनेटचा नवा हीरो ठरतोय. सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालेल्या या व्हिडीओनं लोकांचं लक्ष वेधलं आहे आणि त्यावर मजेशीर कमेंट्सचा पाऊस पडतोय.
घडलं तरी नेमकं काय?
व्हिडीओमध्ये एक केशरी रंगाची Lamborghini Huracan सुपरकार मुंबईच्या एका रस्त्यावरून हळूवार जाताना दिसते. पण अचानक समोर एक भटक्या कुत्रा उभा ठाकतो. कार थांबते. ड्रायव्हर गाडी वळवायचा प्रयत्न करतो, पण कुत्रा काही बाजूला जात नाही. उलट गाडीसमोर चालत राहतो आणि मध्येच तिच्यावर भुंकतोसुद्धा. प्रसंग इतका गमतीशीर आहे की, काही क्षणांनंतर गाडीनं वेग घेतला, तरीही कुत्रा तिचा पाठलाग करत राहतो तोपर्यंत, जोवर ती गाडी नजरेआड होत नाही.
हा व्हिडीओ @Arhantt_pvt या युजरने X (पूर्वीचे ट्विटर) वर १५ जुलै २०२५ रोजी शेअर केला आणि तो काही तासांतच व्हायरल झाला. आतापर्यंत १.२ लाखांहून अधिक व्ह्युज आणि हजारो कमेंट्स मिळाल्या आहेत.
नेटिझन्सनी या व्हिडीओवर भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकानं लिहिलं, “डॉगेशभाई इतक्यांना भाव देत नाहीत!” दुसरा म्हणतो, “गजबची दादागिरी आहे रे डॉगी राजा, लॅम्बॉर्गिनीची सिटी पिट्टी गहाळ झाली!”, एकानं तर म्हटलं, “भाऊनं, अक्षरशः गाडीला धमकावलं!”, नेटिझन्सना डोगेशभाऊचा हा माजदार अॅटिट्यूड एवढा भावला की लोक म्हणायला लागले, “लॅम्बॉर्गिनी हायवेवर चालते: पण मुंबईच्या रस्त्यावर राजा चालतो!
या व्हिडीओवर मिम्स, एडिट्स आणि मजेशीर म्युझिकसह नवनवीन व्हर्जन्स बनवली जात आहेत. प्रेक्षकांना कुत्र्याचं हे दादागिरी रूप प्रचंड भावतंय. याआधीही असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये एक भटक्या कुत्र्यानं IIT कानपूरमध्ये एका रोबोटिक कुत्र्याला चक्रावून टाकलं होतं.
येथे पाहा व्हिडीओ
पण या वेळी… मुंबईच्या रस्त्यावरचा ‘रियल बॉस’ मात्र चार पायांवर चालणारा, चक्क डॉगेश निघाला. हा व्हिडीओ तुम्ही पाहिला नसेल, तर एकदा नक्कीच बघा कारण असं ‘कलेश’ दररोज पाहायला मिळत नाही.