Viral Video : असं म्हणतात, संघर्ष कुणालाच चुकलेला नाही. प्रत्येकाच्या वाटेला संघर्ष येतो आणि हाच संघर्ष माणसाला जगणं शिकवतो. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक चिमुकला भर पावसात रेनकोट विकताना दिसत आहे. चिमुकल्याची मेहनत पाहून तुम्हीही भावूक व्हाल. एवढ्या लहान वयात कष्ट करणाऱ्या या चिमुकल्याची धडपड पाहून काही लोकांच्या डोळ्यांत पाणी येईल. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक चिमुकला भर पावसात रेनकोट विकत आहे. तो रेनकोट विकण्यासाठी धडपडत आहे. तो ग्राहकांना जोरजोराने हाका मारत रेनकोट घेण्यासाठी विनवणी करताना दिसतो. पुढे तो काही लोकांना रेनकोट विकताना सुद्धा दिसतो. जेव्हा त्याच्याकडे सुट्टे पैसे नसते, तेव्हा तो पैसे सुट्टे करण्यासाठी दुसऱ्या एका विक्रेत्याकडे जातो आणि सुट्टे पैसे घेतो आणि ग्राहकांना देतो. जेव्हा तो सर्व रेनकोट विकतो तेव्हा स्वत:च्या अंगावरचे एकच रेनकोट त्याच्याकडे शिल्लक असते. त्यावेळी तो अंगावरचे रेनकोट सुद्धा विकताना दिसतो. भर पावसात भिजत तो लोकांना रेनकोट घेण्यास जोरजोराने हाक मारताना दिसतो. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

हेही वाचा : Viral Video : भरपावसात ट्रकचालकाची माणुसकी! रस्त्यात साठलेल्या पाण्यात अडकली तरुणी; तेवढ्यात चालक देवासारखा धावला अन्…

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : अरे बापरे! पोलिस ठाण्याच्या छतावर पोहोचला चक्क बैल; कर्मचाऱ्यांचा उडाला थरकाप, पुढे जे घडलं… Video पाहून कपाळावर माराल हात

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

pandharichi_vari_adhikrut या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल, तर स्वतःला खूप नशीबवान समजा. कारण देव संघर्ष करायची संधी फक्त त्यांनाच देतो ज्यांच्यामध्ये क्षमता असते…” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, ” पोराच्या रक्तातच संघर्ष हाय, लय मोठा होणार पोरगं कारण अशी पोरं कधीच वाया जात नाहीत” तर एका युजरने लिहिलेय, “संघर्ष रडवतो.. पण आयुष्य घडवतो” आणखी एका युजरने लिहिलेय, “स्वतः परिस्थिती पुढे… ओला चिंब झाला त्यात त्याचे अश्रु नाही दिसत… पण पांडुरंग नक्कीच चिमुकल्याची धडपड पाहत असेल..” हा व्हिडीओ पाहून अनेक युजर्सनी चिमुकल्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.”