Viral video: काही मंडळींना स्टंटबाजी करण्याची फारच हौस असते. ही मंडळी संधी मिळताच चित्रविचित्र स्टंट मारून लोकांचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतात. पण ही स्टंटबाजी काही वेळेस अंगाशी सुद्धा येते. स्टंटबाजांना नको त्या ठिकाणी मार बसतो आणि आयुष्यभरासाठी अपंगत्व येतं. सर्कस म्हंटलं की वेगवेगळे स्टंट आलेच. या सर्कसमध्ये वेगवगळे स्टंट करताना बऱ्याचदा तुम्ही तिथल्या खेळाडूंचे अपघातही झालेले पाहिले असतील. कितीही तरबेज हे खेळाडू असले तरीही, छोट्याश्या चुकांमुळे हे अपघात होतात. दरम्यान सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या तरुणाचं धाडस पाहून तुमच्याही पोटात गोळा येईल. व्हिडीओ पाहून तुमचाही थरकाप उडेल.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, प्रंचड उंचावर एक ब्रिज आहे आणि खाली खोल दिसत आहे. खाली नदी आहे मात्र ब्रीज इतका मोठा आहे की, खाली वाहणारी नदीसुद्धा नीट दिसत नाहीये. धक्कादायक गोष्ट म्हणजे खाली इतकं खोल असतानाही तरुणाने आपल्या जीवाशी खेळ करत हा स्टंट केला आहे. अशा स्टंटमध्ये एक छोटीशी चुकही एखाद्याचा जीव घेऊ शकते. व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांचीही चांगलीच तारांबळ उडाली असून ते व्हिडीओवर कमेंट करताना दिसत आहे. पण पुढे होतं असं की वेळेवर तरुण त्याचं पॅराशूट उघडतो आणि स्वत:चा जीव वाचवतो.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> ‘शिकार करो या शिकार बनो’ विषारी सापानं केला हल्ला; पण माकडानं पकडला फणा, पाहा Video
हा व्हिडीओ सोशल मीडियावर @crazyclipsonly या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला असून, तुम्ही याआधी कधीच पाहिला नसेल.सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे कोणीचं सांगू शकत नाही. त्याचबरोबर त्या गोष्टीचा कोणी अंदाज सुध्दा लावू शकतं नाही. लोक या व्हिडीओवर वेगवेगळ्या कमेंट करुन असा जीवाशी खेळ करु नका असा सल्ला देत आहेत.