Stunt video viral: एके काळी बुलेटचा आवाज आला की, दूधवाला आला अशीच या गाडीची ओळख होती. पण, आता या गाडीची तरुणांमध्ये क्रेझ आहे. स्वस्तातील फोरव्हीलरपेक्षा महाग असलेल्या या गाडीमुळे रुबाब वाढतो, असे तरुणाईचे ‘इंप्रेशन’ आहे. त्यामुळेच आता कॉलेजच्या पार्किंगमध्ये बुलेट दिसू लागली आहे. दरम्यान याच बुलेटवरुन स्टंटबाजी करणं दन तरुणांना चांगलंच महागात पडलंय. सोशल मीडियावर फेमस किंवा व्हायरल होण्यासाठी लोक काय करतील याचा काही नेम नाही. अशात अनेक महानग प्रसिध्दीसाठी स्वतःचा जीव देखील धोक्यात टाकतात. यातील काही जण आपल्या स्टंटमध्ये सफल होतात. तर काहींना जन्माची अद्दल घडते. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होतं आहे.

दोन तरुण रॉयल एनफिल्ड बाइकवर स्टंट करताना दिसत आहेत. यादरम्यान दुचाकीस्वाराचा तोल बिघडतो आणि गाडी घेऊन दोघेही जमिनीवर पडतात. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. royal_.enfield नावाच्या प्रोफाइलवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये काळ्या आणि पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट घातलेला एक व्यक्ती वेगाने बुलेट चालवताना दिसत आहे. भरधाव वेगात बुलेट चालवताना अचानक तोल जातो आणि बुलेटचे वजन पेलता न आल्यामुळे दोघेही पडतात.

पाहा व्हिडीओ

View this post on Instagram

A post shared by Royal Enfield modified (@royal_.enfield)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा – Video: विमानतळावर दोन गटात तुफान मारमारी, कारण ऐकून तुम्ही देखील डोक्याला हात लावाल

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, हा व्हिडीओ पाहून नेटकरी असे स्टंट टाळण्याचे आवाहन करत आहेत.