scorecardresearch

गरमीपासून वाचण्यासाठी पाण्याच्या टाकीपासूनच बनवला स्टाइलिश कुलर; हा देसी जुगाड एकदा बघाच!

कधी कधी अशा जुगाडाची आपण कल्पनाही करू शकत नाही.

desi jugaad cooler
व्हायरल व्हिडीओ (फोटो: @desijugad7 / Instagram)

सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. यामधले अनेक व्हिडीओ देसी जुगाड दाखवणारे असतात. असाच एक हटके देसी जुगाड दाखवणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जेव्हा एखादे काम अवघड किंवा अशक्य असते तेव्हा लोक काहीतरी जुगाड करून त्यांचे काम सोपे करतात. कधी कधी या जुगाडाची करून तुम्ही कल्पनाही करू शकत नाही.

काय आहे व्हायरल व्हिडीओमध्ये?

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एका व्यक्तीने उन्हाळा येण्याआधीच उन्हाळ्यात थंड हवा मिळवण्याचा एक मस्त जुगाड केला आहे. त्या व्यक्तीने घरात पडलेल्या पाण्याच्या टाकीतून कुलर बनवला आहे. व्हिडीओमध्ये दिसत की निळ्या रंगाची प्लास्टिकची पाण्याची टाकी आहे, ज्यामध्ये त्या व्यक्तीने एग्जॉस्ट लाऊन त्याला कुलर बनवला. याशिवाय थंड हवेसाठी टाकीत गवतही बसवले.

(हे ही वाचा: पीव्ही सिंधूचा ‘कच्चा बदाम’ गाण्यावर भन्नाट डान्स, Video Viral)

(हे ही वाचा: Viral: नवजात बाळावरही चढला ‘पुष्पा’ फिवर! IAS अधिकाऱ्यांनी शेअर केला Video)

हा कुलर जुगाडपासून बनवला असला तरी तो दिसायला एकदम स्टायलिश दिसतो. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर desijugad7 नावाच्या पेजवरून शेअर करण्यात आला आहे. हा जुना व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Stylish cooler made from water tank to protect from heat take a look at this desi jugaad ttg

ताज्या बातम्या