अभिनेता सुशांत सिंह राजपूतने वयाच्या ३४ व्या वर्षी आत्महत्या केली होती. सुशांतच्या मृत्यूमुळे त्याचे चाहते खूप दुखावले होते. आजही सोशल मीडियावर सुशांतचे चाहते त्याच्याविषयी भरभरुन प्रेम व्यक्त करतात. सध्या सुशांत सिंह राजपूत एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. सुशांतसारखा दिसणाऱ्या एका तरुणाचे फोटो अन् व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. चाहत्यांना सुशांतचा डूप्लिकेट पाहून आनंद झाला आहे.
सुशांत सिंह राजपूत सारखा दिसणारा हा तरुण कोण?
सुशांत सिंह राजपूत सारखा दिसणाऱ्या या तरुणाचे नाव डोनिम अयान आहे. तो जवळापास सुशांत सिंह राजपूतसारखा दिसतो. त्याच्या चेहऱ्याची ठेवण सुशांतच्या चेहऱ्यासारखीच आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर डोनिम अयानची चांगलीच चर्चा सुरू आहे. अयान त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर त्याचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतो. त्याचे व्हिडीओ आणि फोटो पाहून अनेकजण त्याला फॉलो करत आहे.
हेही वाचा : मित्र की शत्रू! लग्नाच्या स्टेजवर मित्रांनी नवरीसमोर नवरदेवाला पाजली दारू अन…, व्हिडीओ व्हायरल
अयान सुशांत सिंह राजपूतच्या चित्रपटातील गाणे आणि सीन्सला रिक्रिएट करतो आणि ते व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करतो. अयानचा फक्त चेहराच नाही तर त्याचे हावभाव आणि शरीरयष्टीसुद्धा सुशांतसारखीच आहे.
नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव
नेटकऱ्यांना डोनिम अयानचे हे रुप आवडले आहे. अनेक नेटकऱ्यांनी कौतुक करत कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. सुशांतच्या अनेक चाहत्यांनी आर्यनचा हा लूक पाहून त्यांच्या भावना व्यक्त केल्या. एका युजरने लिहिले, “सुशांतची आठवण आली” तर एका युजरने लिहिले, “सेम टू सेम सुशांतसारखा दिसतो” आणखी एका युजरने लिहिले, “असं वाटत आहे की सुशांत सिंह राजपूत परत आला”