Sushma Andhare ukhana video: शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे या नेहमीच त्यांच्या वेगवेगळ्या व्यक्तव्यांमुळे चर्चेत असतात. त्यांची सभांमधली दौऱ्यांदरम्यानची अनेक वक्तव्य आतापर्यंत व्हायरल झाली आहेत. दरम्यान सुषमा अंधारे यांचा आणखी एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. देशात यंदा लोकसभा निवडणूक एकूण सात टप्प्यांत होत आहे. यापैकी १९ एप्रिलला पहिला टप्पा आणि २६ एप्रिलला दुसरा टप्पा पार पडला आहे. तर ७ मेला लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान झालं. या निवडणुकांच्या रणधुमाळीत सुषमा अंधारे यांचा एक जुना व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये सुषमा अंधारे यांनी चक्क लांबलचक उखाणा घेतला आहे. सुषमा अंधारेंनी घेतलेला उखाणा सोशल मीडियावर व्हायरल होत असून विरोधक यावर टीका करत आहेत तर कार्यकर्ते कौतुक करत आहेत.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, सुषमा अंधारे कुठल्या तरी दौऱ्यावर असल्याचं दिसतं आहे. त्यांनी गळ्यात भगवा शेला घातलेलाही दिसत आहे. यावेळी त्यांच्या आजूबाजूला कार्यकर्त्यांची गर्दी दिसत आहे. तर काही महिलांनी सुषमा अंधारे यांचं औक्षणही केलं. “घेऊ का नाव आता” म्हणत सुषमा अंधारे यांनी उखाणा घ्यायला सुरुवात केली. “झुणझुण जाते खिडकीला पाहते, खिडकीला तिन तारा अडकित्ताला घुंगरं बारा, पान खाते करा करा घाम येतो दरा दरा. काढते पदर घालते वारा, तिकडून आला व्यापारी त्यानं दिली सुपारी. सुपारी देते वाण्याला, हंडा घेते पाण्याला. पाणी आणते गंगेचं वाडा बांधते भिंगाचा. वाड्यात वाडे सात वाडे, आधल्या मधल्या वाड्यात खोली खोलीत पलंगावर बशी. बशीवर उशी उशीवर कप, कपात घडी घडीत वाजला एक….अन् उद्धव साहेबांना मुख्यमंत्री करुनच दाखवलं ही महाराष्ट्राची लेक.” असा उखाणा त्यांनी घेतला.

महिलांच्या आग्रहस्तव सुषमा अंधारे यांनी हा उखाणा घेतला आहे. दरम्यान हा व्हिडीओ नेमका कुठल्या ठिकाणचा आहे याबाबत माहिती मिळालेली नाही.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> “नवरा गेला पळून आता काय करायचं रडून?” लहान मुलीनं शाळेत सादर केलेली कविता एकदा ऐकाच; VIDEO पाहून व्हाल लोटपोट

हा व्हिडीओ tatya_rode_444 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला असून व्हिडीओला “तमाम माय बाप जणतेच्या मानाताल बोलल्यात ताई..!” असं कॅप्शन देण्यात आलं आहे. या व्हिडीओवर नेटकरीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.