scorecardresearch

Swachh Survekshan 2022 : इंदोरमधील जल्लोषाकडे आनंद महिंद्रांनी वेधलं जगाचं लक्ष; म्हणाले, “मला आशा आहे जगाने…”

स्वच्छ सर्वेक्षणात इंदोर शहराने सलग सहाव्यांदा प्रथम क्रमांक कायम राखला, तर सुरत आणि नवी मुंबई यांनी अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकावला.

Swachh Survekshan 2022 : इंदोरमधील जल्लोषाकडे आनंद महिंद्रांनी वेधलं जगाचं लक्ष; म्हणाले, “मला आशा आहे जगाने…”
इंदोरमधील जल्लोषाकडे आनंद महिंद्रांनी वेधलं जगाचं लक्ष; म्हणाले, "मला आशा आहे जगाने…"

‘स्वच्छ भारत मिशन’ अंतर्गत ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२२’चा निकाल शनिवारी जाहीर करण्यात आला. त्यानुसार, मध्य प्रदेशने ‘स्वच्छतेबाबतची उत्तम कामगिरी’ या श्रेणीत आपले पहिले स्थान कायम राखले आहे. तर छत्तीसगड आणि महाराष्ट्र अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाची स्वच्छ राज्ये ठरली. स्वच्छ सर्वेक्षणात इंदोर शहराने सलग सहाव्यांदा प्रथम क्रमांक कायम राखला, तर सुरत आणि नवी मुंबई यांनी अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकावला.

यानंतर इंदोर शहरात जल्लोष साजरा केला जात आहे. यासंबंधीचा एक व्हिडीओ उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२२’चा निकाल जाहीर झाल्यानंतर आनंद साजरा करणाऱ्या लोकांच्या व्हिडीओला प्रतिसाद देत आनंद महिंद्रांनी म्हटलंय, “मानसिकतेचे परिवर्तन झाले आहे.” आनंद महिंद्रा यांनी पुढे म्हटलंय, “मला कधीच वाटले नव्हते की, मी असाही दिवस पाहीन जेव्हा एखादे शहर स्वच्छ शहराचे रँकिंग साजरे करेल.”

विधवा सुनेला सासऱ्याचा आधार; थरथरत्या हाताने लावलं कुंकू! सुप्रिया सुळेंच्या स्वागताचा ‘हा’ भावनिक Video ठरतोय चर्चेचा विषय

आनंद महिंद्रा यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय, “भारताबद्दल जगाची अशी धारणा आहे की येथे लोक अनेक प्रसंगी नाचतात आणि उत्सव साजरा करतात. मात्र मला आशा आहे की जगाने उत्सवाच्या या नवीन प्रसंगाचीही दखल घेतली असेल. एक शहर स्वच्छ शहर रँकिंग साजरे करेल असा दिवस दिसेल असे मला कधीच वाटले नव्हते. वास्तवात हे एक मानसिक परिवर्तन आहे.”

स्वतः रणवीर सिंगने केलं रील स्टार किली पॉलचे स्वागत; Video पाहून नेटकरी म्हणतात, “आग लगा दी…!”

मोठ्या शहरांच्या श्रेणीत मध्य प्रदेशातील इंदोर आणि गुजरातमधील सुरतने अनुक्रमे पहिले आणि दुसरे स्थान यंदाही कायम राखले आहे. मात्र यावर्षी आंध्र प्रदेशातील विजयवाडा शहराने आपले तिसरे स्थान गमावले. यंदा विजयवाडाला मागे टाकत नवी मुंबईने तिसरा क्रमांक पटकावला. स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार विजेत्यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या