स्वामी विवेकानंद हे नाव घेतले की आपल्याला आठवतं ते अध्यात्म. नरेंद्र असं मूळ नाव असलेलेल स्वामी विवेकानंद यांचा जन्म १२ जानेवारी रोजी झाला होता. त्यांची जयंती दरवर्षी देशात उत्साहाने साजरी केली जाते. नरेंद्र यांना स्वामी विवेकानंद यांना हे नाव त्यांचे गुरु रामकृष्ण परमहंस यांनी दिलं होतं. स्वामी विवेकानंद विविधगुण संपन्न होते. त्यांचा असाच एक गुण म्हणजे त्यांची स्मरणशक्ती. स्मरणशक्ती तल्लख ठेवायची असेल तर रोज ध्यानधारणा करा आणि एकाग्र चित्ताने पुस्तकं वाचा असं स्वामी विवेकानंद सांगत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणखी वाचा – स्वामी विवेकानंद सर्वव्यापी धर्मविचार! 

विवेकानंद यांची स्मरणशक्ती किती तल्लख होती हे सांगणारा हा प्रसंग

स्वामी विवेकानंद भारत भ्रमण करत होते. त्यांच्यासोबत त्यांचे गुरुबंधू होते. स्वाध्याय, कठोर तप आणि सत्संग यांचा सिलसिला सुरु होता. जिथे चांगले ग्रंथ किंवा पुस्तकं मिळतील ती विवेकानंद वाचून काढत

कोणत्याही नव्या ठिकाणी गेल्यावर सर्वात आधी त्या ठिकाणी ग्रंथालय आहे का? याचा शोध विवेकानंद घेत. एकदा एके ठिकाणी एक ग्रंथालय होतं. तिथे बरीच पुस्तकं होती. जी पाहिल्यानंतर विवेकानंद यांनी ठरवलं की काही दिवस इथेच मुक्काम करु. त्यांचे गुरुबंधू रोज ग्रंथालयातून विवेकानंद यांना पुस्तकं आणून देत. एकदा एक पुस्तक हाती घेतलं की ते स्वामी विवेकानंद वाचून संपवत असत. दुसऱ्याच दिवशी दुसरं पुस्तक आणलं जाई. संस्कृत आणि इंग्रजी भाषेतली पुस्तकं रोज आपल्या ग्रंथालयातून घेऊन दुसऱ्या दिवशी परत आणली जात आहेत ही बाब ग्रंथपालाच्या लक्षात आली. ते स्वामी विवेकानंद यांच्या गुरु बंधूंना म्हणाले रोज नवीन पुस्तक तुम्ही कुणाला दाखवायला घेऊन जाता? तुम्हालाच जर ही पुस्तकं पाहायची असतील तर इथेच पाहात जा रोज एवढी जड पुस्तकं ग्रंथालयाच्या बाहेर कशाला नेता? ज्यावर गुरुबंधू त्यांना म्हणाले की माझे भाऊ विवेकानंद रोज एक पुस्तक वाचतात. त्यानंतर परत करतात. हे ऐकून ग्रंथपाल थक्क झाले. ते म्हणाले मला स्वामी विवेकानंदांना भेटायचं आहे.

आणखी वाचा – चतु:सूत्र (गांधीवाद) : दोन महामानवांचे जीवनदर्शन

हा प्रसंग ज्या दिवशी घडल्या त्यानंतरच्या दुसऱ्या दिवशीच ग्रंथालयाचा ग्रंथपाल स्वामी विवेकानंद यांना भेटण्यासाठी आला. त्यावेळी त्याने स्वामींना तुम्ही रोज एवढी जड आणि जाड जाड पुस्तकं वाचता? असा प्रश्न विचारला. तेव्हा स्वामी विवेकानंदांनी वाचलेल्या पुस्तकांमधले काही मजकूर ग्रंथपालाला जसेच्या तसे सांगितले. हे पाहून चकित झालेला ग्रंथपाल म्हणाला की एवढं वाचलं तर तुमच्या लक्षात कसं राहतं? त्यावर स्वामी विवेकानंद म्हणाले की ध्यानधारणा केल्याने आणि एकाग्रता वाढवल्याने स्मरणशक्ती कुशाग्र होते. कारण एकाग्र होऊन जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट वाचता तेव्हा ती आपसूकच तुमच्या मेंदूत साठवली जाते. त्यामुळे स्मरणशक्ती वाढवायची असेल तर एकाग्र व्हा! असाच संदेश विवेकानंद यांनी दिला.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Swami vivekananda story about good memory scj
First published on: 12-01-2020 at 07:50 IST