Swara Bhasker-Fahad Ahmad Trolled : अभिनेत्री स्वरा भास्कर यांचे पती फहाद अहमद यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतो आहे. या फोटोत फहाद अहमद हे खासदार सुप्रिया सुळे यांच्या मागे छत्री पकडून उभे असल्याचे दिसून येत आहे. महाविकास आघाडीच्या सभेतील हा फोटो असून यावरून आता नेटकऱ्यांनी फहाद अहमद आणि स्वरा भास्कर दोघांनाही ट्रोल केलं आहे.

फहाद अहमद हे सर्व राजकीय फायद्यासाठी करत आहेत, अशी टीका काही नेटकऱ्यांनी केली आहे. फहाद अहमद यांना मुंबईच्या चेंबूर भागातील अनुशक्तीनगरमधून निवडणूक लढवायची आहे, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक हे या मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. पण ते सध्या अजित पवार गटात आहेत.

हेही वाचा – Vinesh Phogat Disqualified : ‘१०० ग्रॅम जास्त वजनाच्या कथेवर तुमचा विश्वास आहे का?’ विनेश फोगटच्या अपात्रतेवर स्वरा भास्करने उपस्थित केला प्रश्न

फहाद अहमद यांना अनुशक्तीनगरमधून तिकीट मिळावी, यासाठी त्यांनी सुप्रिया सुळे यांच्या मागे छत्री पकडल्याचा आरोप तर नेटकऱ्यांनी केला आहे. शिवाय यापुढे जाऊन फहाद अहमद यांची हीच पात्रता आहे, अशी टीकाही काही नेटकऱ्यांनी केली आहे. आज छत्री पकडली, उद्या चप्पलही उचलेल, अशा शब्दात टीका करत नेटकऱ्यांनी फहाद अहमद यांच्या ट्रोल केलं आहे. काही नेटकऱ्यांनी त्यांच्या पत्नी अभिनेत्री स्वरा भास्कर यांनाही लक्ष्य केलं आहे.

हेही वाचा – “किमान ती जिवंत आहे…”, कंगना रणौत यांना कानशिलात लगावल्याप्रकरणी स्वरा भास्करची प्रतिक्रिया; म्हणाली, “या देशात…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, फहाद अहमद हे गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीच्या बैठकीत रोहित पवारांबरोबर दिसले आहेत. विशेषत: जेव्हा एकीकडे महाविकास आघाडीत जागावापटपात आपल्याला डावललं जात असल्याचा आरोप समाजवादी पक्षाकडून केला जातो आहे, अशावेळी फहाद अहमद राष्ट्रवादी काँग्रेसच्या ( शरद पवार ) व्यासपीठावर दिसल्याने विविध राजकीय चर्चांनीही उधाण आलं आहे.