सोशल मीडियावर अनेक थरारक व्हिडीओ व्हायरल होत असतात. यामध्ये अनेक साहसी खेळांचे व्हिडीओ देखील पाहायला मिळतात. झोपाळ्यावर झुलायला कोणाला आवडत नाही. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच झोपाळा आवडतो. झोपाळ्यावर बसून उंच, उंच झोके घेण्यासाठी लहान मुलं तर झोपाळा दिसताच क्षणी त्याकडे धावत जातात आणि झोपाळ्यात बसून उंच झोके घेतात. पर्यटनस्थळी पर्यटकांसाठी मोठंमोठे झोपाळे लावले जातात. ज्यामध्ये बसण्याचा मोह मोठ्या लोकांनाही आवरता येत नाही. त्यामुळे अनेकजण मोठ्या आवडीने झोपाळ्यात बसतात. परंतु आकाशाला भिडणाऱ्या या झोपाळ्यांमध्ये बसणं अनेकदा जिवावर कसं बेतू शकतं याचेच एक उदाहरण समोर आले आहे. जे पाहिल्यानंतर तुमच्याही काळजाचा ठोका चुकेल यात शंका नाही.
अनेक लोकांना झोपाळ्यात बसायला आवडतं. मात्र, झोपाळ्यात बसल्यानंतर आपला थोडासा निष्काळजीपणा जिवावर कसा बेतू शकतो हे या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. व्हायरल व्हिडीओत, एक मुलगी झोपाळ्यात झोके घेत असताना अचानक उलटं लटकल्याचं पाहायला मिळत आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला दोन मुली झोपाळ्यावर बसल्याचं दिसत आहे. यावेळी त्या उंच हवेत झोका घेत असताना अचानक झोपाळा तुटतो आणि दोन मुलींपैकी एकीचा पाय झोपाळ्यात अडकतो, त्यामुळे ती खाली उलटं लटकते. तर पायाच्या साह्याने ती मुलगी झोपाळ्याला खूप वेळ लटकत राहिल्याचं दिसत आहे. शिवाय या मुलीचा पाय झोपाळ्यात अडकल्यामुळेच तिचा जीव वाचला आहे, अन्यथा इतक्या उंचीवरून पडल्याने तिचा मृत्यू झाला असता. या व्हिडीओमध्ये अनेक लोक झोपाळ्याखाली उभे असलेले दिसत आहेत, त्यापैकी काही जण त्या मुलीला वाचवण्यासाठी तिला पकडण्याचा प्रयत्न करत असल्याचं पाहायला मिळत आहे.
हा व्हिडिओ @unilad नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. झोपाळ्याला उलटी लटकलेल्या तरुणीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे, तर सुमारे ४० हजार लोकांनी तो लाईक केला आहे. तर व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक नेटकरी या व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने लिहिलं आहे, “यामुळे मी उंच झोपाळ्यात बसत नाही” तर आणखी एकाने लिहिलं, ‘या मुलीला हे एक वाईट स्वप्नासारखे बघितल्यासारखे वाटले असेल’. तर एका नेटकऱ्याने लिहिलं, देवाचे आभार आहेत की, ती खाली असलेल्या एकाही रॉडला धडकली नाही.