Tamhini Ghat Pune Video : पावसाळा सुरु होण्यापूर्वीच अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे सगळीकडे हिरवेगार वातावरण आहे. या वातावरणात किल्ले, गडकिल्ले, घाट, वॉटरफॉल आणि ट्रेकिंगचा आनंद घेण्यासाठी पुणेकर आणि पर्यटक प्लॅन करतात त्यामुळे शनिवार-रविवारी सर्वत्र गर्दी होताना दिसून येते. पुण्याजवळील सर्वात प्रसिद्ध पर्यटन म्हणजे सिंहगड आणि ताम्हिणी घाट. नुकताच सिंहगडवरील वाहतूक कोंडीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. दरम्यान आता ताम्हिणी घाटातील व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडीओमध्ये ताम्हिणी घाट रस्त्यावरील वाहतूक कोंडी पाहून तुम्हालाही धक्का बसू शकतो.
या व्हायरल व्हिडीओमध्ये ताम्हिणी घाटचा रस्ता दिसत आहे जो जिथे वाहनांच्या लांबच लांब रांग लागली आहे. विशेष म्हणजे हा व्हिडिओ रविवारचा (ता. २५ मे २०२५चा) आहे. जर तुम्ही पुढच्या रविवारला ताम्हिणी घाटात जाण्याचा विचार करत असाल तर आधी हा व्हिडिओ पाहा, कारण ही वाहतूक कोंडी पाहून कदाचित तुम्ही आजच ताम्हिणी घाटात जाण्याचा प्लॅन रद्द करू शकता.
इंस्टाग्रामवर a_boy_in.sahyadri नावाच्या पेजवर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. व्हायरल व्हिडिओ पाहून नेटकरी थक्क झाले आहे. व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “काल सिंहगड, आज ताम्हिणी घाट!” काल सिंहगडला गेलो तर तिथंच ट्रॅफिकचा गड किल्ला झाला. ताम्हिणी घाटात तर विचारूच नका. पावसाची हजेरी लागताच आणि वाहतूक कोंडीचा हंगाम सुरूच झाला! गाडीपेक्षा माणसं जास्त दिसत होती!”
नेटकरी काय म्हणाले?
सध्या हा व्हिडीओवर व्हायरल होत आहे दरम्यान,”व्हायरल व्हिडीओवर कमेंट करत एकाने लिहिले की, खऱ्या पुणेकरांनी ताम्हिणी घाट, सिंहगड, खंडाळा, माळशेज घाट, लोणवळा, अशा अनेक सुप्रसिद्ध निसर्गरम्य स्थळी फिरायला जाणे दहा वर्षांपूर्वीच सोडले. जे लोक दिसत आहे ते फक्त एलियन्स आहेत”
दुसऱ्याने सांगितले की, “ताम्हिणी घाटात रासायनिक टॅकर पलटी झाला आहे. आजच मी तिथे जाऊन आलो.”
तिसऱ्याने कमेंट केली की,”काय ते कौतुक ताम्हिणी घाटाचे आमचे महाबळेश्वर काय कमी आहे”
चौथ्याने कमेंट केली की,”आज ताम्हिणी घाटाजवळ अँसिडच्या टँकरचा अपघात झाल होता. त्यामुळे पौड व ताम्हिणी घाट येथे वाहतूक बंद ठेवण्यात आली होती.”
पाचव्याने कमेंट केली की, “पुण्याचे लोक कुठेही गेले तर चुकीच्या दिशेने गाडी चालवतात आणि वाहतूक कोंडी करतात पुण्यात एवढा मोठा रस्ता आहे तरी पण वाहतूक कोंडी करतात”
ताम्हिणी घाटात ऍसिडने भरलेला टँकर पलटला
ताम्हिणी घाटातील ही वाहतूक कोंडी फक्त पर्यटकामुळे नाही तर त्यामागे आणखी एक कारण आहे. ताम्हिणी घाटात डोंगरवाडी गावाजवळ रविवारी २५ मे रोजी हायड्रोक्लोरिक ऍसिड नेणारा टँकर रस्त्याच्याकडेला खाली पलटी झाला. यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ॲसिड गळती झाली आणि धूर देखील निघत होता. या अपघातात कोणालाही दुखापत झालेली नाही.
घटनास्थळी वन विभागाचे कर्मचारी व पोलीस पोहचले त्यांनी खबरदारी घेऊन त्या ठिकाणी नियोजन केले. वाहतूक सुरळीत केली. त्यानंतर सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्थेची टीम त्या ठिकाणी पोहोचली व ऍसिड गळती रोखणे, आजूबाजूचा परिसर सुरक्षित करणे आदी कार्यवाही सुरु झाली आणि टँकर काढण्यास सुरुवात करण्यात आली.