Tamhini Ghat Video: लोणावळा, खंडाळा परिसरातील निसर्गसौंदर्य हे पावसळ्यात पर्यटकांना भुरळ पाडत आहे. त्यामुळे विकेंडच्या दिवशी मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी होत आहे. पुणे-मुंबईसह लगतच्या भागातून नागरिक या ठिकाणच्या विविध पॉईंटवर गर्दी करत आहेत. तुम्हीही या विकेंडला ताम्हिणी घाटामध्ये फिरायला जाण्याचा बेत आखत असाल तर हा व्हिडीओ एकदा नक्की बघा. ताम्हिणी घाटातला आणखी एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे जे गाडी घेऊन या घाटात जाणार आहेत, त्यांनी तर हा व्हिडीओ आवर्जून पाहावा.

‘अति घाई संकटात नेई’ हे वाक्य आपण जवळपास प्रत्येक हायवेवर वाचलं आहे. कारण वेगाने गाडी चालवून अपघात होण्यापेक्षा संथ गतीने सुखरुप घरी पोहोचलेलं बरं, हा या वाक्यामागचा मुख्य उद्देश आहे. तरी देखील काही मंडळी या सल्लाकडे दुर्लक्ष करतात. अन् पुढे याची मोठी किंमत त्यांना मोजावी लागते. याचिच प्रचिती देणारी एक घटना समोर आली आहे. कितीही अनुभवी ड्रायव्हर असला तरी घाटात गाडी चालवणे म्हणजे रिस्क आलीच. कधी कोणतं वळण येईल आणि थेट गाडी दरीत जाईल याचा नेम नसतो. त्यामुळे घाटात गाडी सावकाश चालवण्याचा सल्ला दिला जातो. मात्र प्रत्यक्षात हे ऐकताना कुणीही दिसत नाही.

आता ताम्हिणी घाटातला नवा व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये रस्त्याच्या कडेला गाड्या थांबवून जे पर्यटक पर्यटनाचा आनंद लुटत असतात त्यांच्या बाईकमुळे अपघात घाटात भीषण अपघात झाला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक स्कूटी आणि बाई चालकाचा मोठा अपघात झाला आहे. यामध्ये एक तरुण गंभीर जखमी झाला असून तो रस्त्यावर पडला आहे. यावेळी त्याचा मित्र त्याला उठवण्याचा प्रयत्न करत आहे, जोरजोरात आक्रोश करताना दिसत आहे. त्याचा पायही अपघातात पूर्णपणे तुटल्याचं दिसत आहे. त्यामुळे अशाप्रकारे पावसाळ्यात घाटात प्रवास करताना प्रत्येकानं सतर्क राहत प्रवास केला पाहिजे किंवा अशाठिकाणी येणं टाळलं पाहिजे.

पाहा व्हिडीओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ताम्हिणी घाट हे सह्याद्रीच्या पर्वत रांगांमध्ये वसलेल्या पश्चिम घाटामध्ये असलेले निसर्गरम्य ठिकाण आहे. पावसाळ्यात अनेक लोक निसर्गसौंदर्य भरभरून अनुभवण्यासाठी ताम्हिणी घाटाला आवर्जून भेट देतात. ताम्हिणी घाट महाराष्ट्रातील एक घाटरस्ता, जो पुणे जिल्ह्यातील मुळशी आणि रायगड जिल्ह्यातील माणगांव या गावांना जोडतो. पावसाळ्यात टेकड्या हिरवाईने आच्छादलेल्या असतात आणि इथून मुळशी धरणाचे दृश्य अतिशय सुंदर असते. ताम्हिणी घाटातून उंचावरून वाहणारे सुंदर धबधबे पाहण्याचा आनंद काही वेगळाच असतो. मात्र स्वत:ची काळजी घेणे महत्त्वाचे आहे.