मैत्री हे जगातलं सर्वात सुंदर नातं आहे. परिस्थिती कितीही वाईट असो जो साथ सोडत नाही तोच खरा मित्र असे आपण नेहमी ऐकतो. दोन चिमुकल्यांनी मैत्रीची ही व्याख्या खरी करून दाखवली आहे. सध्या सोशल मीडियावर दोन चिमुकल्यांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये दोघेही एकच सायकल चालवताना दिसत आहे. चिमुकल्यांनी ज्या पद्धतीने सायकल चालवली आहे ते पाहून तुम्ही पोट धरून हसाल. दोघांची ही मैत्री पाहून तुम्ही देखील त्यांचे कौतूक कराल. एखाद्याची साथ द्यायची ठरवली तर ती कशीही देता येते हे या मुलांनी सिद्ध करून दाखवले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे ज्यामध्ये दोन लहान मुलांनी सायकल चालविण्यासाठी भन्नाट जुगाड वापरला आहे. मुलांचा हा जुगाड तुम्हाला देखील नक्कीच आवडेल.
सायकल चालविण्यांसाठी मुलांनी केला देशी जुगाड
सर्वांचे मन जिंकणाऱ्या व्हिडिओ पाहून तुमच्या लहानपणीच्या आठवणी नक्कीच ताज्या होतील. व्हायरल व्हिडिओमध्ये दोन लहान मुलं आपल्या भन्नाट शैलीने सायकल चालविताना दिसत आहे जे पाहून तुमच्या चेहऱ्यावर हसू येईल. व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या या चिमुकल्यांकडे एक छोटी सायकल आहे पण त्या सायकलला एकच सीट आहे. त्यामुळे सायकल चालविताना एकावेळी एकच जण सीटवर बसू शकतो. पण या दोन मुलांनी या समस्येवर अतरंगी जुगाड शोधला आहे आणि एकच सायकल दोघांनी चालवली आहे. तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे? हीच तर या व्हिडिओची विशेषता आहे. सायकलच्या एका पँडलवर एक जण आणि दुसऱ्या पँडलवर दुसरा असे उभे राहून या दोघांनी ही सायकल चालवली आहे. त्यांनी सायकल चालविण्याची नवीन पद्धतच जणू शोधली आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्ही पोट धरून हसाल आणि तुमच्या बालपणीच्या आठवणींमध्ये हरवून झालं.
हेही वाचा – कधीही पाहिला नसेल असा जुगाड! कारच्या सेफ्टीसाठी पठ्ठ्याने लावली अतरंगी फ्रेम! पाहा Video
सायकल तुटेल पण मैत्री नाही!
विशेष म्हणजे या सायकल एक व्यक्ती स्वार होऊ शकतो हे माहित असूनही दोघेही एकमेकांना सोडून गेले नाही उलट एकच सायकल दोन व्यक्ती कशा चालवू शकतात याची नवीन पद्धत दोघांनी शोधून काढली. चिमुकले असूनही दोघांची मैत्री किती घट्ट आहे हेच यावरून दिसते. दोघांनी केलेला जुगाड अयशस्वी ठरला असता किंवा कदाचित सायकल देखील तुटली असती पण दोघांनीही त्याची पर्वा न करता आपल्या मित्राला सोडून न जाणे योग्य समजले.
हेही वाचा : रेस्टॉरंटमधून मागवल्या नूडल्स, शेवटचा घास खाताना त्यात दिसला जिवंत बेडूक, पाहा धक्कादायक व्हिडीओ
5 मिलियनपेक्षा जास्त लोकांनी पाहिला व्हिडिओ
सोशल मीडियावर प्लॅटफॉर्म ट्विटरवर हा जबरदस्त व्हिडिओ शेअर केला आहे. ज्याला भरपूर प्रतिक्रिया मिळत आहे. आणि या वर्षी ३१ला शेअर केले आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत ५ मिलियनपेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे तर ५३ हजारपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडिओला पसंती दर्शवली आहे. फक्त २१ सेकंदाच्या या व्हिडिओवर लोकांच्या भरपूर प्रतिक्रिया मिळत आहे.