एकीकडे सरकार ग्रामीण भागातील शिक्षणाचा स्तर सुधारण्यासाठी कोट्यवधी रुपयांच्या वेगवेगळ्या योजना राबवत आहे. तर दुसरीकडे खुद्द शिक्षण विभागातील काही लोक अशा योजनांना काळीमा फासण्याचे काम करत आहेत. सोशल मीडियावर सरकारी शाळांमधील शिक्षणाच्या गैरसोयीबद्दलचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या असाच एका शाळेतील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये एका शिक्षकाने विद्यार्थ्याला डोक्यातील उवा काढण्याचे काम सांगितल्याचं दिसत आहे.
बिहारच्या शिक्षण व्यवस्थेतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे अनेक व्हिडीओ याआधीही व्हायरल झाले आहेत. अशातच आता या नवीन व्हिडीओ पाहिल्यानंतर पालकांसह नेटकऱ्यांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे. कारण या व्हायरल व्हिडीओमध्ये एका शिक्षकाने विद्यार्थ्याला डोक्यातील उवा काढायला सांगितल्याचं दिसत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर पालकांनी बिहारची शिक्षण व्यवस्था आणि मुलांच्या भविष्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण बिहारमधील सहरसा येथील असल्याचं सांगितलं जात आहे. जिथे एका शिक्षकाने विद्यार्थ्याला डोक्यातील उवा काढायला सांगितल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेशी संबंधित एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये शिक्षक खुर्चीवर बसून फोनवर बोलताना दिसत आहे. यावेळी शिक्षकाच्या मागे डोक्यावर हात ठेवून एक विद्यार्थी उभा असल्याचं दिसत आहे. विद्यार्थ्याला उवा काढायला लावल्याचा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडीओ प्राथमिक शाळेतील असल्याचं सांगितलं जात आहे. शिवाय हा शिक्षक मुलांना शिकवण्याऐवजी मोबाईलमध्ये व्यग्र असल्याचं दिसत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकरी त्यावर वेगवेळ्या प्रतिक्रिया देताना दिसत आहे. एका यूजरने लिहिलं आहे की, सहरसा येथील ईटहरी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक विद्यार्थ्याला उवा काढायला लावत असताना त्यांच्या मोबाइलवर रील पाहण्यात व्यस्त आहेत. सुशासन बाबू मुलांचे भविष्य अंधारात ढकलत आहेत. तर आणखी एका युजरने लिहिलं, “अशी मजा करण्यासाठी बिहारमधील प्रत्येकाला शिक्षक व्हायचे आहे, आणि भाजप त्याला पाठिंबा देत आहे.”