Patali Kamariya Song Viral Video: ‘पतली कमरिया मोरी हाय हाय’ या गाण्यानं सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. तरुणांना वेड लावणारं हे गाणं दिवसेंदिवस लोकप्रीय होताना दिसत आहे. या गाण्यावर तरुणी भन्नाट डान्स करून रील्स इंटरनेटवर व्हायरल करत आहेत. शाळेत भर वर्गात एका शिक्षिकेनं पतली कमरिया गाण्यावर जबरदस्त ठुमक लगावल्याचा व्हिडीओ नुकताच व्हायरल झाला होता. या व्हिडीओची चर्चा सुरु असतानाच आता दुसऱ्या एका तरुणीच्या डान्सचा भन्नाट व्हिडीओ समोर आला आहे. एका तरुणीने चक्क बुलेटवर ‘पतली कमरिया’ गाण्यावर ठुमके लगावण्याचा प्रयत्न केला. पण गाणं पतली कमरिया होतं पण बुलेटचं वजन खूप असल्याने त्या तरुणीची मोठी फजिती झाल्याचं व्हायरल झालेल्या व्हिडीओत पाहायला मिळत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘पतली कमरीया’ गाण्यावर बुलेटवर डान्स करणं तरुणीला पडलं महागात

नेटकऱ्यांनी सुरु केलेला ट्रेंड पापा की परी पुन्हा एकदा इंटरनेटवर चर्चेत आला आहे. कारण एका तरुणीला पतली कमरिया मोरे गाण्यावर थिरकरण्याचा मोह आवरला नाही. गाण्याचे बोल सुरु होताच ही तरुणी जबरदस्त ठुमके मारायला सुरुवात करते. पण बुलेटवर बसून डान्स करताना तिची चांगलीच फजिती झाली. कारण तरुणीला डान्स करत असताना बुलेटच्या वजनाचा समतोल राखता न आल्याने तिची फजिती झाली. बुलेटवर बसलेली तरुणी डान्स करत असताना तोल गेल्यावर जमिनीवर खाली पडली. बुलेटवर पतली कमरिया गाण्यावर डान्स करणं या तरुणीला चांगलंच महागात पडलं. हा मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हीही लोटपोट हसल्याशिवाय राहणार नाहीत, कार हा व्हिडीओ खूपच मजेशीर आहे. या व्हिडीओला नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Teen girl dancing on patali kamariya song bullet bike ride goes in wrong way watch virala video on instagram netizens funny reactions nss
First published on: 13-01-2023 at 16:07 IST