Telangana Youth Cobra Stunt: हल्ली रील बनविण्यासाठी वाट्टेल त्या थराला जाण्याची तयारी काही जण करत असतात. नको ते धाडस जीवावर बेतू शकते, हे माहीत असतानाही अनेकजण सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळविण्यासाठी नको ते व्हिडीओ बनविण्याचे धाडस करतात. अशा घटना दिवसेंदिवस समोर येतात. सोशल मीडियावर असे व्हिडीओ व्हायरल होतात. तरीही रोज कुणी ना कुणी जीवाशी खेळ करणारे व्हिडीओ करतात. तेलंगणात एका २० वर्षीय युवकाने थेट कोब्रा जातीच्या नागाला तोंडात धरून व्हिडीओ काढण्याचा प्रयत्न केला. व्हिडीओ तर बनला, पण सदर युवकाला आपले प्राण गमवावे लागले आहेत. नेमके काय घडले? हे पाहू

नेमके प्रकरण काय?

तेलंगणात घडलेल्या या घटनेतील मृत तरुणाचे नाव शिवराज असल्याचे सांगितले जाते. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये शिवराज आपल्या तोडांत कोब्रा जातीचा नाग धरून रस्त्याच्या मधोमध उभा असल्याचे दिसत आहे. नागाचे डोक शिवराजने त्याच्या तोडांत धरलं आहे. शिवराज कॅमेऱ्यात पाहून हात जोडताना दिसतो, तसेच मधे मधे तो आपल्या केसांवरूनही हात फिरवतो. दरम्यान नाग आपली सोडवणूक करण्यासाठी शेपटी हलविताना दिसून येत आहे. व्हिडीओ संपवताना शिवराज चित्रीकरण करणाऱ्या व्यक्तीला अंगठा दाखवतो आणि तिथे व्हिडीओ संपतो.

हे वाचा >> धक्कादायक! विमान हवेत जाताच लोक बेशुद्ध झाले; इंडिगोच्या विमानात नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

तेलगू स्क्राइब या संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार, शिवराज आणि त्याचे वडील सापांना मारून आपली उपजीविका चालवितात. हा नाग या बाप-लेकांनीच पकडला होता. तसेच वडिलांच्या सांगण्यावरून शिवराजने नागाला तोंडात धरून रील बनवायला घेतलं. मात्र व्हिडीओ संपवून नागाला तोंडातून बाहेर काढताना नागाने शिवराजला दंश केला. ज्यात त्याचा मृत्यू झाला.

हे ही वाचा >> बापरे! पाकिस्तानी व्यक्तीने सिंहिणीसोबत केले असे कृत्य की…; VIDEO पाहून तुम्हीही थक्क व्हाल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर लोकांनी काय प्रतिक्रिया दिली?

सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एक्स आणि फेसबुकवर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. नागाला तोंडात धरण्याचे नाहक धाडस करण्याची काय गरज होती? असा प्रश्न अनेकांनी विचारला आहे. ‘हे किती भीतीदायक आहे आणि असले नको ते उद्योग करावेच कशाला?’, अशी प्रतिक्रिया एका युजरने दिली आहे. “फक्त रीलसाठी अशी जोखीम पत्करणे हे शहाणपणाचे लक्षण नाही. भावपूर्ण श्रद्धांजली”, अशी प्रतिक्रिया दुसऱ्या एका युजरने दिली आहे.