Amusement Park Accident: तुम्ही कधी झुल्यावर बसून हवेत ३६० अंश फिरणं अनुभवलंय का? कल्पना करा, हवेत झुला फिरतोय… आणि अचानक ती राईडच दोन भागात तुटते. एकाच क्षणात हवेतून थेट खाली, किंकाळ्यांचा भयानक आवाज, दहशतीचा प्रसार आणि रक्ताच्या थारोळ्यात बुडालेले लोक.
ही घटना आहे एका प्रसिद्ध एम्यूजमेंट पार्कमधली, जिथं “३६० डिग्री” नावाच्या थरारक राईडमध्ये काही क्षणांतच भीषण अपघात घडला. सोशल मीडियावर या घटनेचा धक्कादायक व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये दिसतं की लोक हवेत झुलत होते, आनंदात होते… आणि अचानक एका जोरदार आवाजानंतर झुल्याचा पोल मध्यभागीच तुटतो. त्या तुटलेल्या पोलसह संपूर्ण राईड थेट जमिनीवर आदळते.
त्या थरारक क्षणात लोकांची घाबरलेली, किंकाळ्या मारणारी अवस्था पाहून अंगावर अक्षरशः काटा येतो. काही जण झुल्याखाली अडकले, काही दूर फेकले गेले… तर काहींच्या अंगावरच पोलचा भाग आदळला. एकूण २३ जण गंभीर जखमी झाले असून, त्यातील तीन जणांची प्रकृती अत्यवस्थ असल्याचं अधिकृत सूत्रांनी सांगितलं आहे. प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं की, पोल एवढ्या जोरात तुटला की त्याचा एक भाग उलट बाजूला बसलेल्या प्रवाशांवर आदळला. काही जण फेकले गेले, काही जण झुल्याच्या धक्क्याने जागेवरच जखमी झाले.
हादरून गेलेला संपूर्ण परिसर!
अपघातानंतर काही सेकंदांसाठी सर्वत्र शांती पसरते, पण नंतर किंकाळ्या, धावपळ, मदतीचे आवाज… आणि पोलिस, रेस्क्यू टीम घटनास्थळी धाव घेतात. जखमींना तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आलं. प्रशासनाने घटनास्थळ सील करत तपास सुरू केला आहे. ही राईड तुटण्यामागचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही, पण यंत्रसामग्रीतील बिघाडाची शक्यता वर्तवली जात आहे.
आणि ही थरकापजनक घटना घडली आहे सौदी अरेबियाच्या ‘ताइफ’ शहरातील ‘ग्रीन माऊंटन एम्यूजमेंट पार्क’मध्ये. सौदी अरेबियातील ताइफ शहराजवळील ग्रीन माऊंटन एम्यूजमेंट पार्कमध्ये घडलेली ही घटना पाहून प्रत्येक जण हादरला आहे. ‘३६० डिग्री राईड’ एक क्षणात भयावह दुर्घटनेत बदलली आणि ती आठवण आयुष्यभराची भीती बनून मनात कोरली गेली. अशा प्रकारचे अपघात याआधीही अनेक ठिकाणी घडले आहेत. भारतातही काही महिन्यांपूर्वी अशाच एका झुल्यावरून पडून तरुणीचा मृत्यू झाला होता, त्यामुळे अशा राईड्समध्ये सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
येथे पाहा व्हिडीओ
हा व्हिडीओ पाहताना फक्त मनोरंजन म्हणून न पाहता, प्रत्येक झुल्यावर बसताना ‘सेफ्टी बेल्ट’ फक्त पट्टा नसून ‘जीवनरेषा’ आहे हे लक्षात ठेवा.