Why Not to Eat Cauliflower in Monsoon: पावसाळा सुरू झाला की, हवेमध्ये गारवा, हिरवाई आणि थोडीशी आळसाची भावना दरवळते. गरम गरम भजी, वाफाळती चहा-कॉफी आणि पावसात ताज्या भाज्यांनी बनवलेले चमचमित पदार्थ ह्याचं वेड सगळ्यांनाच असतं. पण, या पावसाळी आनंदामध्ये एक धोकादायक सावली दबक्या पावलांनी प्रवेश करत असते, जिची जाणीव आपल्याला बहुतेक वेळा फार उशिरा होते… आणि तोपर्यंत कधी कधी फार उशीर झालेला असतो.

हो, पावसाळ्यात फक्त पाणीच नव्हे तर अनेक प्राणीदेखील सुरक्षित आश्रयाच्या शोधात घराच्या आत, शूजमध्ये, गाड्यांमध्ये इथपर्यंत ठीक आहे, पण आता ते तुमच्या थेट थाळीत पोहोचत आहेत. बाजारातून आणलेल्या ताज्या भाज्यांमध्ये जेव्हा काही ‘अतिथी’ लपलेले असतात, तेव्हा केवळ भूक नाही तर जीव धोक्यात येतो. एक अशीच धडकी भरवणारी घटना सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आहे, जी बघून तुम्ही आता बाजारातून भाजी आणताना हजार वेळा विचार कराल!

ताज्या, टवटवीत दिसणाऱ्या फुलकोबीच्या आत लपलेली होती एक अशी गोष्ट, जिला पाहून हृदयाचे ठोके क्षणभर थांबतील. एका महिलेने साध्या भजीसाठी घेतलेली फुलकोबी जेव्हा कापायला घेतली, तेव्हा तिचा तो क्षण आयुष्यभर लक्षात राहावा असा ठरला. कारण शेवटी उलगडतो त्या फुलकोबीच्या आत लपलेल्या खर्‍या खतरनाक रहस्याचा थरारक खुलासा…!

पावसाळा सुरू झाला की सरपटणारे प्राणी कोरड्या जागांचा शोध घेतात. मग ती जागा तुमचं घर असो, बूट असो, गाडी असो किंवा अगदी तुमची स्वयंपाकघरातली भाज्यांची परडी असो. अशीच थरकाप उडवणारी घटना सोशल मीडियावर सध्या जोरात व्हायरल होत आहे.

एका महिलेने बाजारातून ताजी-तवानी फुलकोबी आनंदाने आणली. फुलकोबी कापायला घेतली आणि एका पानात थोडी हालचाल जाणवली. ती काहीशी अनैसर्गिक वाटली… आणि पुढचं काही क्षणांत घडलं ते पाहून तिचा श्वासच रोखला गेला.

पाने उलगडताच धक्का बसला!

महिलेने जरा खोलात जाऊन पानं बाजूला केली आणि एकदम अचानक एक सरपटणारा प्राणी तिच्या समोर आला. फुलकोबीच्या आतमध्ये बसलेला साप. तो साप लगेचच बाहेर रेंगाळायला लागला. त्याच्या हालचाली पाहून घरात भीतीचं वातावरण निर्माण झालं. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आणि पाहता पाहता सोशल मीडियावर धुमाकूळ घालू लागली. पावसाळ्यात साप आपली आश्रयस्थाने शोधताना भाज्यांमध्ये शिरकाव करतात हे दाखवणारा हा प्रकार त्याचं जिवंत उदाहरण.

येथे पाहा व्हिडीओ

सांप विषारी नव्हता… पण?

व्हिडीओतील साप कदाचित कुकरी जातीचा (Oligodon arnensis) असावा असं काही युजर्सचं म्हणणं आहे. तो विषारी नसला तरी त्याचं कोबीमध्ये असणं हीच कल्पना अंगावर काटा आणणारी आहे. काही वर्षांपूर्वी असाच एक प्रकार इंग्लंडमधील ब्रोकोलीत घडला होता.

शेवटी शिकवण हीच – फुलकोबी असो की कोणतीही भाजी, पावसाळ्यात काटेकोरपणे धुऊन आणि तपासूनच वापरा!