10-Foot King Cobra in Village: अचानक गावात एक हालचाल झाली… कुणालाही कळेना काय घडलंय. लोक धावत सुटले, ओरडू लागले… कारण समोरून येत होता काळा, चमचमणाऱ्या पट्ट्यांचा जवळपास १० फूट लांबीचा ‘किंग कोब्रा’! क्षणभर सगळ्यांचे श्वास रोखले गेले, कोणावर तरी हल्ला होईल या भीतीने मागे हटले… पण पुढे जे घडलं, ते पाहून सगळ्यांचे डोळे विस्फारले गेले! या खतरनाक नागाने असा पलटी करणारा खेळ केला की, व्हिडीओ पाहणाऱ्यांच्याही अंगावर काटा उभा राहील…”
उत्तराखंडमधील चंपावत जिल्ह्यातील खरककार्की गावात घडलेली एक घटना सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओत तब्बल १० फूट लांबीचा प्रचंड किंग कोब्रा गावाच्या रस्त्यावर दिसतो. एवढा मोठा साप पाहून गावकऱ्यांच्या अंगावर अक्षरशः काटा येतो. पण, लोकांचा डोळ्यांवर विश्वास बसत नाही. कारण- इतका विशाल नाग डोळ्यांसमोर पाहणं म्हणजे काही सोपी गोष्ट नाही.
गावकऱ्यांचा धसका
व्हिडीओत काळसर रंगाचा किंग कोब्रा त्याच्या पांढऱ्या पट्ट्यांसह स्पष्ट दिसतो. गावकरी त्याला पाहतात आणि घाबरून ओरडतात – “अरे बापरे!” काही जण भीतीने मागे सरकतात, तर काही मोबाईल काढून चित्रीकरण सुरू करतात. आश्चर्य म्हणजे साप रागावलेला नसतो, तो न फणा काढतो, न हल्ला करतो. उलट गावकऱ्यांचा आवाज ऐकून तो विजेसारखा वेगाने डोंगराच्या दिशेनं पळ काढतो. त्याची सरपटण्याची जलद गती आणि लवचिक हालचाल पाहून सगळेच थक्क होतात.
वन विभागाची धावपळ
गावकऱ्यांनी तत्काळ वन विभागाला कळवले. काही वेळातच वन विभागाची टीम घटनास्थळी दाखल झाली आणि त्यांनी काळजीपूर्वक त्या सापाला जखमी न करता पकडलं. नंतर त्याला सुरक्षितपणे जंगलात, त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलं. तज्ज्ञ सांगतात की, किंग कोब्रा हा नक्कीच विषारी आहे; पण तो मुळात माणसांपासून दूर राहणं पसंत करतो. तो फक्त धोका जाणवला तरच हल्ला करतो.
सोशल मीडियावर धुमाकूळ
हा थरारक व्हिडीओ @askbhupi यांनी एक्स (Twitter) वर शेअर केला गेला असून, काही तासांतच लाखो लोकांनी तो पाहिला. युजर्सचे रिअॅक्शन्सदेखील भन्नाट – कुणी म्हणालं, “इतका मोठा कोब्रा पहिल्यांदाच पाहिला!” तर कुणी मजेत लिहिलं, “हा तर रॅम्प वॉक करत जंगलात निघून गेला!” एका युजरने तर कॉमेंट केली, “आज कळलं… सापही माणसांना घाबरतात!”
येथे पाहा व्हिडीओ
हा व्हिडीओ फक्त भीतीदायक वाटत असला तरी तो एक मोठा धडा शिकवतो – जंगली जीवांना त्यांच्या नैसर्गिक घरातच राहू द्या, त्यांना छेडू नका.