Snake Eating Snake Video: जंगलात घडणारे प्रसंग कधी आश्चर्यचकित करतात; तर कधी अंगावर काटा आणतात. असाच एक थरारक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत जे दिसतंय, ते पाहून अनेकांच्या अंगावर काटा आला. अचानक हालचाल होते आणि डोळ्यांसमोर उभं राहतं असं दृश्य, जे कुणाच्याही अंगावर काटा आणेल. ही घटना एखाद्या थरारपटाची आठवण करून देणारी आहे; पण ही खरी आहे. कारण- इथे शिकार उंदीर, पक्षी किंवा बेडूक नाही… तर एक सापच दुसऱ्या सापाला गिळताना दिसतोय. हे दृश्य इतकं भीषण आहे की, डोळ्यांसमोर पाहणारा माणूस क्षणभर नि:शब्द होतो. जंगलाच्या या रहस्यमय दुनियेत कधी काय अतर्क्य घटना घडेल ते सांगता येत नाही आणि हा व्हिडीओ त्याचंच ताजं उदाहरण ठरत आहे.

आपण सापाला सहसा उंदीर, बेडूक किंवा लहान पक्षी खाताना पाहतो; पण इथे दिसतंय ते काही वेगळंच आहे. व्हिडीओत एक मोठा साप दुसऱ्या सापाला हळूहळू गिळताना दिसतोय. त्यानं आपल्या भक्ष्याला अर्ध्यापर्यंत गिळलं असून, उरलेला भाग अजून बाहेर लोंबताना दिसत आहे. हे दृश्य इतकं अविस्मरणीय आणि भीषण आहे की, डोळ्यांवर विश्वास बसणं कठीण .

वन्यजीव तज्ज्ञ सांगतात की, सापांमध्ये ‘स्वजातीभक्षणाची प्रवृत्ती’ म्हणजेच स्वतःच्या प्रजातीतील लहान सापांना गिळण्याची घटना अधूनमधून घडते. विशेषतः जेव्हा मोठ्या सापांना इतर अन्नाची कमतरता भासते किंवा आपल्या हद्दीवर आपलं वर्चस्व टिकवायचं असतं, तेव्हा ते छोट्या सापांना शिकार बनवतात. या घटनेला निसर्गाचा क्रूर आणि थरारक चेहरा म्हणावं लागेल.

हा थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर @TheeDarkCircle या हँडलवरून शेअर करण्यात आला आहे. एक मिनिटाच्या या छोट्याशा क्लिपनं सध्या लोकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. आतापर्यंत ५६ हजारांहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून, शेकडो नेटिझन्सनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. कोणीतरी हा प्रसंग “हाडं गोठवणारा” असल्याचं म्हटलं; तर एका व्यक्तीनं “निसर्ग किती क्रूर असू शकतो, याचं जिवंत उदाहरण” असं भाष्य केलं.

काहींना हा व्हिडीओ पाहताना सुरुवातीला वाटलं की, हे एखाद्या हॉरर सिनेमाचं दृश्य असावं; पण प्रत्यक्षात ही खरी घटना आहे. मात्र, हा व्हिडीओ नेमका कुठल्या जंगलात चित्रित करण्यात आला, याची स्पष्ट माहिती मिळू शकलेली नाही. तरीसुद्धा हा व्हायरल व्हिडीओ लोकांच्या अंगावर काटा आणतोय हे नक्की.

येथे पाहा व्हिडीओ

जंगलातील या भयानक घटनेनं पुन्हा एकदा दाखवून दिलं की, निसर्ग हा सुंदरच नाही, तर भयावह आणि निर्दयीसुद्धा ठरू शकतो. त्याचा हा थरारक चेहरा सोशल मीडियावर पाहून लोक खरंच थरारले आहेत.