Thailand’s Coconut Jelly : इंटरनेटमुळे आपण जगाशी जोडले गेलो आहोत. जगभरातील विविध देश, त्यांचे राहणीमान, त्यांची संस्कृती, खाद्यपदार्थ याबाबत सहज जाणून घेता येते. तुम्ही भारतीय खाद्यपदार्थांचे अनेक व्हायरल व्हिडीओ रोज पाहत असाल; तसेच इतर देशांतील काही खाद्यपदार्थांचेही व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या थायलंडमधील एक प्रसिद्ध स्ट्रीट फूडचा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये नारळापासून जेली कशी तयार केली जाते हे दाखवले आहे. हा आश्चर्यकारक व्हिडीओ लोकांना मोठ्या प्रमाणात आवडला आहे.

व्हायरल व्हिडीओ इन्स्टाग्रामवर बँकॉक फूडी या पेजवर शेअर केलेला आहे. हा व्हिडीओ बँकॉकमधील कोको होम नावाच्या एका आउटलेटमधील आहे, जिथे नारळापासून जेली तयार करून ५५ बहतमध्ये (साधारण १३० रुपये) विकतात.

हेही वाचा – मित्राशेजारी झोपण्यासाठी हत्तीच्या पिल्लाची धडपड, व्हायरल व्हिडिओ पाहून व्हाल थक्क!

हेही वाचा – “आमच्या पप्पांनी गणपती आणला”; चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरील भाव पाहून तुम्हीही व्हाल त्याचे चाहते…पाहा व्हायरल व्हिडिओ

हा व्हिडीओ पोस्ट केला गेल्यानंतर लाखो लोकांनी पाहिला आहे आणि अनेकांनी पसंतीही दर्शवली आहे. पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे- ”थायलंडमध्ये नारळापासून जेली तयार करणे.” व्हिडीओमध्ये नारळापासून जेली तयार करण्याची संपूर्ण प्रक्रिया दाखवण्यात आली आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, सर्वांआधी झाडावरचे शहाळे धारदार सुऱ्याने कापले आणि सोलले. त्यानंतर त्या शहाळ्यातील पाणी दुसऱ्या भांड्यात काढून, त्या पाण्यात नंतर जिलेटिन टाकले जाते. रिकाम्या झालेल्या शहाळ्याला एक विशिष्ट आकार दिला जातो. त्यात शहाळ्याची मलई टाकून, त्यामध्ये तयार जेलीचे मिश्रण टाकले जाते. मग हे क्लिंग फिल्ममध्ये गुंडाळून, ग्राहकांना विकले जाते.

हेही वाचा – सोशल मीडियावर व्हायरल होतेय ‘कांदा भेंडी’, अभिनेता जॅकी श्रॉफने सांगितली रेसिपी, पाहा व्हिडीओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शहाळ्यापासून जेली तयार करण्याची ही प्रक्रिया लोकांना फार आकर्षक वाटली. एका युजरने सांगितले की, अशा गोष्टी तयार करण्यासाठी इतके काम करावे लागत असेल याची कधी जाणीव झाली नव्हती.