सोशल मीडियावर कलाकार, इन्फ्लुएन्सर, ब्लॉगर नवनवीन गोष्टी विविध माध्यमातून सगळ्यांसमोर घेऊन येतात. यातले बरेच व्हिडीओ चांगला संदेश, मजेशीर कन्टेन्ट, तर काही भावूक करणारेसुद्धा असतात. पण, एकंदरीतच कलाकार त्यांच्या कलेने अनेकांना चकित करून सोडतात. तर सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. एका कलाकाराने चक्क हिंदी चित्रपटातील गाणं त्याच्या कलेद्वारे सादर केलं आहे, जे पाहून तुम्ही थक्क व्हाल.

सुरुवातीला कलाकार एका मुलीचे चित्र कागदावर काढतो आहे. यात मुलीला पिवळ्या रंगाची साडी नेसली आहे, असे दाखवण्यात आले आहे. ४०६ कागदांवर त्याने या एकाच मुलीचे चित्र रेखाटले आहे. पण, विविध स्टेप्स आणि वेगवेगळे हावभाव करताना. तर कलाकाराने एका गाण्यासाठी ४०६ चित्रांच्या आवृत्या तयार केल्या आहेत. बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खानचा रा.वन (Ra.one) हा चित्रपट २०११ मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटातील छम्मक छल्लो हे गाणं अगदीच प्रसिद्ध आणि तरुण मंडळींच्या आवडीचे आहे. तर कलाकाराने हे गाणं सादर करण्यासाठी त्याच्या कलेचा उपयोग केला आहे. कलाकाराने आपल्या कलेतून कशाप्रकारे हे गाणं सादर केलं एकदा तुम्हीसुद्धा बघाच…

हेही वाचा… Video: हा दांडिया नाही, तर सुरू आहे पोलिसांचा लाठीचार्ज; उत्तर प्रदेशात रशियन डान्सरचा शो पाहण्यासाठी तोबा गर्दी

व्हिडीओ नक्की बघा :

२६ दिवसांत रेखाटल्या ४०६ फ्रेम :

रा.वन चित्रपटातील छम्मक छल्लो या गाण्यात अभिनेत्री करीना कपूरच्या जबरदस्त स्टेप्स आजही तरुण मंडळींच्या लक्षात आहेत. तसेच अनेक कार्यक्रमात गाणं वाजताच आजही काही जण या गाण्यावर हुबेहूब स्टेप्स करत ठेका धरताना दिसून येतात. तर एका कलाकाराने या गाण्यावर आपली कला सादर केली आहे आणि गाण्यातील सगळ्या सिग्नेचर स्टेप्स चित्राच्या माध्यमातून कागदावर उतरवल्या आहेत आणि सगळ्यात शेवटी गाणं लावून ४०६ चित्रांची झलक दाखवली आहे. तरुणाने या गाण्यावर स्टेप्स न करता अगदीच अनोख्या पद्धतीने त्याच्या कलेचं सादरीकरण केलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२६ दिवसांत कलाकाराने गाण्यातील एक एक स्टेप्सचं वेगवेगळं चित्र रेखाटलं आहे, जे पाहून कोणालाही आश्चर्य वाटेल. सोशल मीडियावर हा व्हिडीओ @abhiram या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे. या कलाकाराचे नाव अभिराम असे आहे. व्हिडीओ पाहून अनेक जण तरुणाच्या मेहनतीचे आणि त्याच्या अद्भुत कलेचं विविध शब्दात कौतुक करताना तर व्हिडीओ पाहून अनेकांच्या अंगावर काटा आला आहे, असे काही जण व्हिडीओखाली कमेंट करताना दिसून आले आहेत.