हत्ती हा प्राणी अत्यंत हुशार आणि भावनिक प्राणी आहे असे म्हणतात. हत्तींची हुशारी दर्शवणारे आणि त्यांनाही भावना आहेत हे सिद्ध करणारे कित्येक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. काही दिवासांपूर्वीच एका हत्तीचा व्हिडिओ चर्चेत आला होता ज्यामध्ये विजेचा प्रवाह सुरू असलेले तारेचं कुंपण अत्यंत हुशारीने बाजूला करतो. हत्ती किती बुद्धिमान असतात हे या व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल पण हत्ती किती भावनिक असतात हे नुकत्याच चर्चेत आलेल्या व्हिडिओ पाहिल्यानंतर सिद्ध होईल. हत्तींना भावना असतात आणि त्यांना भावनांची कदरही असते हे दर्शवणाऱ्या व्हिडीओने नेटकऱ्यांचे मन जिंकले आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये एका हत्तीच्या पिल्ला तहान लागली आहे. पाणी पिण्यासाठी हत्ती काय करतो हे व्हिडीओमध्ये दाखवले आहे. त्यानंतर हत्तीण जे करते ते पाहून नेटकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटले आहे.
व्हिडिओच्या सुरुवातीला एका हत्तीण आणि तिचे पिल्लू रस्त्यावरून चालताना दिसते. जवळच एक माणूस हातात पाईप घेऊन झाडांना पाणी घालत आहे. हत्तीच्या पिल्ला खूप तहान लागलेली आहे कारण तो पाणी दिसताच धावत त्या तरुणाकडे जातो आणि पाणी मागतो. तो तरुण देखील अत्यंत प्रेमाने आणि हळूवारपणे पाण्याचा पाईप हत्तीच्या पिल्लाकडे वळवतो आणि त्याला पाणी पिण्याची परवानगी देतो. तहानलेले पिल्लू तहान भागताच आपल्या रस्त्याने चालू लागते. पण हत्तीण तिच्या पिल्लू पाणी पाजणाऱ्या तरुणाचा दयाळूपणा विसरत नाही. हत्तीण लगेच सोंड हवेत उंच उचलते आणि त्या तरुणाचे आभार मानते.
@thebulletinx या इंस्टाग्राम पेजवरून शेअर केलेल्या हा हृदयस्पर्शी व्हिडिओ अल्पावधीच व्हायरल झाला. त्याला दोन दशलक्षाहून अधिक व्ह्यूज आणि १,६८,००० लाईक्स मिळाले आहे. पोस्टच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे: “एक हृदयस्पर्शी व्हायरल व्हिडिओ दाखवतो की, एक हत्तीण तिच्या तहानलेल्या बाळाला पाणी दिल्याबद्दल एका माणसाचे ‘आभार’ मानते. व्हिडिओमध्ये आई हत्तीण कृतज्ञतेच्या भावनेने तिची सोंड उंचलत आहे. हे दृश्य हत्तींच्या बुद्धिमत्तेवर आणि भावनिकतेवर प्रकाश टाकते. मानवाने मदतीबद्दल कृतज्ञता दाखवण्याची त्यांची क्षमता दर्शवते.”
हा व्हिडिओ येथे पहा:
सोशल मीडिया वापरकर्ते हत्तीणीची कृती पाहून खूप प्रभावित झाले.
एका वापरकर्त्याने लिहिले, “हा(पाणी देणारा तरुण) माणूस आयुष्यभरासाठी धन्य झाला आहे.” दुसऱ्या वापरकर्त्याने कमेंट केली, “ हत्तीचे पिल्लू अत्यंत गोंड आहे.” तिसऱ्या वापरकर्त्याने म्हटले, “किती सुंदर, मला बऱ्याच वेळा वाटते… की हत्ती त्यांच्या मनाने अत्यंत निर्मळ असतात… मी पाहिलेल्या सर्वात निष्पाप प्रजातींपैकी एक.”