मित्र-मैत्रिणींबरोबर सकाळी लवकर उठून चालायला (Moring Walk) जायचं, सायकल चालवायची किंवा व्यायाम करायचा, असं आपण अनेकदा ठरवतो. पण, हा प्लॅन कधीच यशस्वी होत नाही आणि ग्रुपमधील एखादा मित्र किंवा मैत्रीण असे असतात; जे कधीच सकाळी लवकर उठत नाहीत आणि आपण त्यांना फोन करून उठवण्याचा प्रयत्न केला, तर ते फोनसुद्धा उचलत नाहीत. आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ पाहायला मिळाला आहे. मित्र सकाळी मॉर्निंग वॉकला नियमित येत नाही म्हणून सगळ्या ग्रुपने मिळून एक अजब युक्ती केली आहे.

व्हायरल होणारा हा व्हिडीओ मित्रांच्या ग्रुपचा आहे. सगळे मित्र आळशी मित्राच्या घरी जातात; जो कधीच सकाळी लवकर उठून चालायला येत नाही. मग सगळ्या मित्रांनी मिळून एक युक्ती केली आणि ते मित्राच्या घरी गेले. पूर्ण ग्रुप मित्राच्या घराबाहेर वाद्य वाजवणाऱ्यांना घेऊन जातात आणि त्यांना जोरजोरात पिपाणी, डफली घेऊन वाजवायला सांगतात. तो आवाज ऐकताच मित्र घराबाहेर येतो. मित्राला मॉर्निंग वॉकला घेऊन जाण्यासाठीची ही कमाल युक्ती तुम्हीसुद्धा एकदा व्हिडीओतून नक्की बघा…

हेही वाचा… फक्त २ रुपयाच्या शॅम्पूने करा तवा नव्या सारखा पांढरा शुभ्र, तवा स्वच्छ करण्याचा अनोखा जुगाड, VIDEO पाहाच

व्हिडीओ नक्की बघा :

सकाळी लवकर उठून चालणं आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतं, असं आपण अनेकदा ऐकलं आहे. तसेच मित्र-मैत्रिणींसोबत चालायला जाताना मन मोकळं करणं, गप्पा मारणं, कुटुंबातील काही समस्यांबाबत चर्चा करणं आदी अनेक गोष्टी यादरम्यान केल्या जातात. पण, यासाठी एखादा मित्र जर मॉर्निंग वॉकला येत नसेल आणि झोप पूर्ण न होण्याचं कारण देत असेल, तर आपण त्याला चिडवतो किंवा त्याच्याशी भांडतो. पण, इथे असं न करता मित्रांनी डफली व पिपाणी वाजवण्याच्या युक्तीचा वापर करून, त्या खास मित्राला उठवून मॉर्निंग वॉकसाठी घेऊन जायचे ठरवले. या व्हिडीओत सगळे मित्र घराबाहेर उभे राहतात आणि दोन वादक पिपाणी, डफली वाजवून मित्राला उठवतात. मग चालायला नियमित न येणारा मित्र घराबाहेर येतो आणि हे दृश्य पाहून हसू लागतो.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @DpHegde एक्स (ट्विटर) या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच या व्हिडीओला “मॉर्निंग वॉकसाठी नियमित न येणाऱ्या व्यक्तीच्या घरी मित्र पोहोचतात. आरोग्य म्हणजे संपत्ती” अशी कॅप्शन देण्यात आली आहे. अनेक जण हा व्हिडीओ पाहून मजेशीर कमेंट्स करताना दिसत आहेत. तसेच काही जण असे मित्र असणं किती गरजेचं आहे हे कमेंट्समध्ये सांगताना दिसून आले आहेत.