दिसतं तसं नसतं असं म्हटलं जातं, या वाक्याला साजेसा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो पाहिल्यानंतर तुम्ही समुद्र किनाऱ्यावर फिरायला गेल्यानंतर चालताना किंवा बीचवर बसताना तुम्ही दहा वेळा विचार कराल यात शंका नाही. हो कारण या व्हिडीओमध्ये पूर्णपणे स्वच्छ दिसणाऱ्या बीचवर किती मोठ्या प्रमाणात कचरा असू शकतो हे पाहायला मिळत आहे.

समुद्र किनारा असो किंवा गड-किल्ले अशा ठिकाणी फिरायला जातात लोक बरोबर खाण्यापिण्याचे पदार्थ मोठ्या प्रमाणात घेऊन जातात. काही लोक खाद्यपदार्थांवरील पॅकींगचे प्लास्टिक कागद, किंवा ग्लास तिथेच टाकतात. त्यामुळे अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा साचतो. कधी कधी हा कचरा डोळ्यांनी दिसत नाही पण तो किती मोठ्या प्रमाणावर साचून राहिलेला असतो हेच या व्हिडीओत दिसत आहे.

हेही पाहा- प्रियकराला भेटण्यासाठी प्रेयसी अख्ख्या गावाची लाईट घालवायची, विचित्र आयडीया अंगलट आली पण शेवटी मनासारखं झालं

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये, एक व्यक्ती समुद्रकिनारा स्वच्छ करत असताना त्याला काय काय मिळालं हे पाहिल्यानंतर तुम्हीही थक्क होऊन जाल यात शंका नाही. @TheFigen_ नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, “वाळूच्या आतमध्ये लपलेले प्लास्टिकचे छोटे तुकडे बाहेर काढून सफाई करताना” हा व्हिडिओ १७ जुलै रोजी शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती जुगाडच्या साहाय्याने वाळूमध्ये लपलेला कचरा बाहेर काढत आहे. स्वच्छ दिसणार्‍या वाळूतून एवढा कचरा बाहेर निघतो की जे पाहिल्यानंतर अनेकांना डोळ्यांवर विश्वास ठेवणं कठीण होत आहे.

हा व्हिडीओ अनेकांना आवडल्याचं पाहायला मिळत आहे, तर अनेकांनी हा व्हिडीओ पाहिल्यानंतर किनाऱ्यावर कचरा करु नये अन्यथा तो पर्यटकांसाठी धोक्याचा ठरु शकतो असं म्हटलं आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत दहा लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर नेटकरी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. अनेकांनी या व्हिडीओतील तरणाच्या कृतीचं कौतुक केल्याचंही कमेंट सेक्शनमध्ये पाहायला मिळत आहे.