सोशल मीडियावर सापांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. असे व्हिडीओ पाहून एकतर आपण आश्चर्यचकित होतो किंवा ते पाहिल्यानंतर आपल्याला प्रचंड भीती वाटते. सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये मगर आणि साप अत्यंत धोकादायक मानले जातात. या पृथ्वीतलावर असे काही साप आढळतात, जे अतिशय विषारी आहेत. जर हे साप चावले तर काही क्षणातच समोरच्याचा मृत्यू होऊ शकतो.

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल. इन्स्टाग्रामवरील या ट्रेंडिंग व्हिडीओमध्ये दिसून येत आहे की लोकांच्या मनात अजूनही प्राण्यांबद्दल प्रेम आणि माणुसकी आहे. या व्हिडीओमध्ये एक माणूस सापाला पाण्याचा ग्लास देताना दिसतो. मात्र सापाने अचानक फणा काढला आणि अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला.

newly wedded wife calls her husband aho viral video
बायकोची ‘ती’ हाक ऐकताच लाजली ‘अहों’ची स्वारी! सासरची मंडळीही खुदकन हसली; पाहा Video
Taiwan Earthquake
Taiwan Earthquake : भूकंपाची चाहूल लागताच कुत्र्याने घरातल्या लोकांना केले सावध, तैवान येथील भूकंपाचा व्हिडीओ व्हायरल
people washing plates in fountain in wedding
Viral Video : लग्नात सजावटीसाठी लावला होता पाण्याचा कारंजा, पण लोकांनी जेवणाची ताटं धुतली, एकदा व्हिडीओ पाहाच
delivery boy slept on his bike,
“थकलेल्या जीवाला सावलीचा विसावा”, कडक उन्हात रस्त्याच्या कडेला दुचाकीवरच झोपला डिलिव्हरी बॉय! Video Viral

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एका व्यक्तीच्या हातात ग्लास असून त्या ग्लासमध्ये पाणी असल्याचे दिसत आहे. त्याचवेळी व्हिडीओमध्ये काळ्या रंगाचा सापही दिसत आहे. त्याचा काळा रंग आणि त्याचा फणा यामुळे हा साप खूपच भयानक दिसतो. व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये साप ग्लासमध्ये ठेवलेले पाणी आरामात पीत आहे.

कोल्डड्रिंकमध्ये सापडली मेलेली पाल; McDonald’s च्या ‘या’ आउटलेटमध्ये घडला किळसवाणा प्रकार

‘मौका भी हैं… कानून भी!’ मुंबई पोलिसांचा भन्नाट रिप्लाय पाहून नेटकरी झाले चकित

या दरम्यान, त्या व्यक्तीच्या मनात कोणतीही भीती किंवा दहशत नसते. अचानक साप काचेच्या ग्लासमधून फणा काढतो आणि त्या व्यक्तीच्या हाताकडेही बघतो. सापांना मदत करणे ही खरोखरच चांगली गोष्ट आहे, परंतु हे साप तुमच्या जीवाला कधीही हानी पोहोचवू शकतात हे देखील तुम्हाला माहित असले पाहिजे. त्यामुळे सावधगिरी आणि सुरक्षा व्यवस्थापनाशिवाय कधीही सापांसोबत मस्करी करू नये.