Viral Video : अनेकदा घरी जाताना किंवा महत्त्वाचं काम असतं तेव्हा वेळेत रिक्षा मिळत नाही किंवा ओला, उबर (Ola And Uber) या कॅब वेळेवर येत नाहीत. तर यावेळी आपण रस्त्यावर एखाद्याची मदत घेतो किंवा कुटुंबातील किंवा मित्र-मैत्रिणींना फोन करून न्यायला येण्यास सांगतो. आज सोशल मीडियावरसुद्धा असंचं काहीसं पाहायला मिळालं आहे. एका तरुणाला घरी जाण्यासाठी रिक्षा मिळत नसते. म्हणून तो एक वेगळाच जुगाड करतो; जे पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही.
व्हायरल व्हिडीओ पुण्याचा आहे. तरुण घरी जाण्यासाठी रिक्षा किंवा कॅब बघत असतो; पण त्याला रिक्षा, कॅब मिळत नाही म्हणून तो एक भन्नाट जुगाड करतो. तरुण रॉयल हेरिटेज मॉलसमोर उभा असतो. तिथल्या मॅक्डोनल्डस्मध्ये (Mcdonalds) जाऊन तो काहीतरी खायला ऑर्डर करतो आणि त्यावर घरचा पत्ता टाकतो. त्यानंतर झोमॅटो डिलिव्हरी बॉयची वाट बघत असतो. वाट बघून तो डिलिव्हरी बॉयला फोन करतो आणि माझ्या ऑर्डरसोबत मलासुद्धा घरी सोडा, असं सांगतो. तसेच डिलिव्हरी बॉय मॅक्डोनल्डस्मधून त्याची ऑर्डर घेतो आणि दुचाकीवरून तरुणालासुद्धा घरी सोडतो. घरी जाण्यासाठी तरुणानं केलेला भन्नाट जुगाड एकदा तुम्हीसुद्धा व्हिडीओतून बघाच…
व्हिडीओ नक्की बघा :
घरी जाण्यासाठी घेतली डिलिव्हरी बॉयची मदत :
घरी जाण्यासाठी रिक्षा, कॅब मिळत नसते म्हणून तरुणानं भलताच जुगाड केलाय आणि त्यामध्ये डिलिव्हरी बॉयची मदत घेतली आहे. डिलिव्हरी बॉयनं तरुणाला घरी सोडावं म्हणून तो बर्गर ऑर्डर करून, स्वतःचा पत्ता तिथे लिहितो; जेणेकरून डिलिव्हरी बॉय ऑर्डर घ्यायला येईल तेव्हा तरुण त्याच्यासोबत घरी जाऊ शकेल. तसेच डिलिव्हरी बॉय तरुणाची ही युक्ती पाहून त्याच्यासोबत मोबाईलमध्ये सेल्फी घेताना दिसतो आहे. तसेच घरी सुखरूप पोहोचल्यानंतर तरुण ऑर्डर केलेला बर्गर डिलिव्हरी बॉयलासुद्धा देतो आणि त्याचे आभार मानतो.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ @sarthaksachdevva या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. सार्थक सचदेवा, असं या युजरचं नाव आहे; तसेच तो एक सोशल मीडियाचा इन्फ्लुएन्सर आहे.व्हिडीओ पाहून अनेक जण विविध कमेंट करताना दिसून आले आहेत.