सोशल मीडियावर अनेक आश्चर्यकारक घटनांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड रात्रीच्या वेळी रस्त्यावर फिरत असताना काही चोरटे त्यांना लुटण्याचा प्रयत्न करतात. यावेळी अशी काही घटना घडते की ते पाहून अनेकजण आश्चर्यचिकीत झाले आहेत. कारण व्हिडिओमध्ये हातात बंदूक असलेल्या चोरट्यांनी तरुणीला पकडताच तिचा बॉयफ्रेंड तेथून पळून गेल्याचं दिसत आहे.
खरंतर जेव्हा जवळचे लोक संकटात सापडतात तेव्हा त्यांना मदत करणं आपलं कर्तव्य असतं. मात्र, या व्हायरल व्हिडिओमधील बॉयफ्रेंड आपल्या गर्लफ्रेंडला संकटात सोडून पळून जात असल्याचे पाहून अनेकजण आश्चर्यचकित झाले आहेत. व्हिडिओमध्ये रात्रीच्या वेळी रस्त्याने चालत असलेल्या गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंडला काही चोरटे बंदुकीचा धाक दाखवून लुटण्याचा प्रयत्न करतात. यावेळी ते चोरटे सुरुवातीला तरुणीला लुटण्याचा प्रयत्न करतात. यावेळी व्हिडीओतील मुलगा त्याच्या गर्लफ्रेंडला तिथेच सोडून पळून जाताना दिसत आहे.
व्हायरल होत असलेला व्हिडिओ @TheFigen_ नावाच्या ट्विटर अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. प्रियकराच्या कृत्यामुळे संतापलेल्या नेटकऱ्याने व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, प्रियकराने आपल्या प्रेयसीला मृत्यूच्या दारात सोडले, हा मर्द असू शकत नाही, असं लिहिलं आहे. व्हिडीओमध्ये, जेव्हा चोरटे तरुणीला लुटायचा प्रयत्न करतात तेव्हाच तिचा बॉयफ्रेंड पळून गेल्याचं पाहायला मिळत आहे.
व्हिडिओ पाहून नेटकरी थक्क –
व्हिडीओतील तरुणी मदतीच्या आशेने मागे असलेल्या आपल्या प्रियकराकडे वळून पाहते, त्यावेळी तो पळून गेल्याचं समजतं. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून आतापर्यंत तो एक लाख ६३ हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. अनेकांनी गर्लफ्रेंड संकटात असताना तिला पळून जाणाऱ्या बॉयफ्रेंड भित्रा म्हटलं आहे. तर अनेकांनी हे कसलं प्रेम? असा प्रश्न विचारला आहे.