बकरी ईदमध्ये कुर्बानीसाठी आणलेल्या एका रेड्याने चांगलाच गोंधळ घातला आहे. या रेड्याला ट्रकमधून मुरादाबादला आणलं होतं, यावेळी त्याला पाहण्यासाठी मोठ्या संख्येने लोकांनी गर्दी केली होती. लोकांची गर्दी पाहून रेडा अचानक उधळला आणि त्याने थेट ट्रकमधून खाली उडी मारली आणि पळायला सुरुवात केली. मार्केटमध्ये भरधाव वेगाने धावणाऱ्या या रेड्याने अनेकांना धडकदेखील दिली असून ही थरारक घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
उडी मारुन पळाला रेडा –
वृत्तानुसार, मुरादाबादमध्ये ट्रकमधून रेडा आणला होता. यावेळी त्याला उतरवण्याचा प्रयत्न केला असता, गर्दी पाहून तो गोंधळला आणि त्याने ट्रकमधून थेट तिथे जमलेल्या लोकांमध्ये उडी मारली. ज्यामुळे एकच गोंधळ उडाला तर अनेकजण रेड्याच्या धडकेत जखमी झाले आहेत. शिवाय अनियंत्रित रेडा लोकांच्या तावडीतून पळून गेला.
कुर्बानी देण्यासाठी आणला होता रेडा –
हेही वाचा- बकरी ईदपूर्वी पालटलं गरीब शेतकऱ्याचं नशीब; ‘अल्लाह’ शब्दामुळे रातोरात बनला लखपती
बकरी ईदनिमित्त कुर्बानीसाठी जनावरांची खरेदी केली जात आहे. दरम्यान, मुरादाबादमधील गलशहीद पोलीस स्टेशन हद्दीतील पाथर चौकात एक रेडा कुर्बानीसाठी आणला होता, मात्र तो गर्दी पाहून गोंधळूला आणि अचानक पळू लागला. रेडा अनेक किलोमीटर पळत राहिला आणि लोक त्याला पकडण्यासाठी मागे-पुढे धावत होते. दरम्यान, एका ठिकाणी लोकांनी रेड्याला पकडून परत आणले. या संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यावर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.