सोशल मीडियावर दररोज काही ना काही व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी अगदी विचार करायला लावणारे तर कधी चेहऱ्यावर हसू उमटवणारे हे व्हिडीओ असतात. असाच एक हसवणारा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये एक कुत्रा थंडीमुळे काय करतो हे दिसत आहे. तो इतका अस्वस्थ आहे की तो दोन पायांवर चालत आहे.

नक्की काय?

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक कुत्रा दोन पायांवर बर्फात चालत असल्याचे दिसत आहे. प्रचंड थंडीमुळे कुत्रा हे करत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सोशल मीडियावर लोकांच्या प्रतिक्रिया येत आहेत. अलीकडे हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. नेटीझन्स लाईक्स आणि कमेंट्सद्वारे या व्हिडीओवर खूप प्रेम दर्शवतात.

(हे ही वाचा: बिबट्याने हल्ला करताच कुत्र्याने त्याचाच पकडला जबडा; थरारक Video Viral)

नेटीझन्सची प्रतिक्रिया

व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. Buitengebieden या नावाच्या अंकाऊटवरती हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. आतापर्यंत हा व्हिडीओ १ लाख ३० हजाराहून अधिक लोकांनी पाहिला आहे. त्याचबरोबर इतरही अनेकांनी या व्हिडीओवर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

(हे ही वाचा: १० फुटांच्या अजगराशी खेळण्यासारखे खेळतोय २ वर्षाचा मुलगा; Video Viral!)

(हे ही वाचा: ‘कोहली भज्जीची दुसरी आई’ हरभजन सिंगने विराटला दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा वाचून तुम्हालाही हसू आवरणार नाही!)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या व्हिडीओवर एका यूजरने कमेंट करत लिहिले ‘या कुत्र्याला खूप थंडी वाजत असल्याचे दिसते.’ आणखी एका यूजरने लिहिले ‘या कुत्र्याचा व्हिडीओ खूपच मजेदार आहे.’ तिसऱ्या यूजरने लिहिले ‘अप्रतिम व्हिडीओ, असे व्हिडीओ क्वचितच पाहायला मिळतात.’ व्हिडीओच्या कमेंट सेक्शनमध्ये हजारो इमोजीही पाहायला मिळत आहेत.