अनेक लोकांना घरामध्ये प्राणी पाळायला खूप आवडतं. इतर प्राण्यांच्या तुलनेत घरामध्ये सर्वात जास्त कुत्रा पाळला जातो. अनेकांना कुत्रा आपल्या घरात असावा असं वाटतं. शिवाय ते आपल्या कुत्र्याची खूप काळजी घेतात, त्यांना मनापासून जपतात. कुत्रा हा पाळीव प्राण्यांमध्ये सर्वात जास्त लोकप्रिय आणि विश्वासू प्राणी आहे. अनेक मालक सोशल मीडियावर त्यांच्या पाळीव कुत्र्याचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात. जे पाहून अनेकदा नेटकरी थक्क होतात. सध्या असाच एका गोल्डन रिटरिवर कुत्र्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो पाहिल्यानंतर अनेकजण आश्चर्यचकित झाले आहेत.

खरंतर, आपल्या निरोगी शरीरासाठी व्यायाम करणं खूप गरजेचं असतं. प्राण्यांची शाररीक हालचाल माणसाच्या तुलनेत जास्त असते त्यामुळे त्यांचा व्यायाम आपोआप होतो. पण बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक पाळीव प्राणीदेखील दिवसभर एकाच ठिकाणी बसून असतात. यासाठीच की काय एका कुत्र्याने चक्क आपल्या मालकाबरोबर व्यायाम करण्याचा निर्णय घेतल्याचं पाहायला मिळत आहे. कारण सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमधील कुत्रा माणसांना लाजवेल अशा प्रकारे व्यायाम करताना दिसत आहे.

हेही पाहा- ‘आमच्या पप्पांनी गणपती आणला’ गाण्याचं विदेशी व्हर्जन पाहिलत का? साईराजप्रमाणे ‘या’ चिमुकलीच्या गोंडस अभिनयाची नेटकऱ्यांना पडली भुरळ

व्हिडीओमध्ये एक महिला जी या कुत्र्यांची मालकीण आहे ती वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम करताना दिसत आहे. यामध्ये ती पहिल्यांदा जमीनीवर झोपते त्यावेळी कुत्राही ती करेल तशी कृती करतो. नंतर ती एक पाय हवेत ठेवून व्यायाम करते त्यावेळी कुत्राही हुबेहूब तिच्यासारखा व्यायाम करतो. जे पाहिल्यानंतर अनेकांना डोळ्यावर विश्वास ठेवणं कठीण होत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कुत्रा व्यायाम करतानाचा क्यूट व्हिडीओ goldiescute नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. जो आतापर्यंत १.५ मिलियूनहून अधिक लईक केला आहे. तर हजारो लोकांनी त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका नेटकऱ्याने लिहिलं, “किती प्रेमळ नातं आहे, मला हा कुत्रा खूप गोड आहे.” तर दुसऱ्या एकाने लिहिलं, “सर्वात मनमोहक गोष्टींपैकी एक, मी बऱ्याच खूप दिवसानंतर असं दृश्य पाहिलं.” तर अनेकजण या व्हिडीओवर लव्ह इमोजी टाकताना दिसत आहे.