सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा अंदाज कोणीच लावू शकत नाही. त्यापैकी बरेच व्हिडीओ आहेत, जे खूप मजेदार असतात. असे व्हिडीओ पाहून तुम्ही तुमचं हसू आवरू शकत नाही तर, असे काही व्हिडीओ असतात जे तुम्हाला विचार करायला लावतात. काही व्हिडीओ बघून तुमचा तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसत नाहीत. सध्या सोशल मीडियावर एका लहान मुलाचा मजेशीर व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर प्रत्येकजण हा ऑनलाइन क्लासेसचा परिणाम असल्याचे सांगत आहे. स्कूटीच्या सीटवर लिहिलेला शब्द लहान मुल वाचत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे, मात्र तो वाचल्यानंतर तो उच्चारलेला नवीन शब्द ऐकून कोणीही हसू आवरू शकणार नाही.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक लहान मूल स्कूटीच्या सीट कव्हरवर लिहिलेले इंग्रजी शब्दाचे अक्षर वाचत आहे. मूल सर्व अक्षरे अचूकपणे वाचतो पण, शेवटी तो जो पूर्ण शब्द उच्चारतो ते ऐकून हसायला येत.

(हे ही वाचा: Video Viral: ‘तेरी झलक अशरफी श्रीवल्ली…’ गाण्यावरचा चिमुकल्याचा डान्स एकदा बघाच!)


(हे ही वाचा: विराट कोहलीचा श्रीवल्ली स्टाईल डान्स बघितला? शानदार कॅच घेतल्यानंतरचा Video Viral)

वास्तविक, सर्व अक्षरे बरोबर वाचल्यावरही हा चिमुकला पूर्ण शब्द स्कूटी म्हणून सांगतो. तुम्ही पाहू शकता की स्कूटीच्या सीट कव्हरवर स्कूटी लिहिलेले नसून त्यावर ज्युपिटर लिहिलेले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(हे ही वाचा: Viral Video: …आणि एका क्षणात पक्षांचा थवा आकाशातून खाली डला)

नेटीझन्सच्या प्रतिक्रिया

इन्स्टाग्रामवर comedynation.teb नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत हजाराहून अधिक लोकांनी लाईक केले आहे, अनेकांनी इमोटिकॉन्सच्या माध्यमातून यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. करोना महामारीमुळे, लोकांच्या या नवीन सामान्य जीवनाच्या या ऑनलाइन वर्गाचा लहान मुलांवरही नकारात्मक परिणाम झाला आहे.