सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती जपानमधल्या गरोदर पुरुषांची. जपानच्या रस्त्यावर काही राजकिय नेते प्रेगन्ससी बेल्ट घालून फिरत आहे यामागे कोणताही राजकिय हेतू नसून फक्त जपानी पुरुषांनी जबाबदार पुरूष बनावे इतकाच निस्वार्थी हेतू मनात ठेवून ते रस्त्यावर फिरत आहे. २०१४ मध्ये जपानमध्ये एक सर्वेक्षण करण्यात आले. त्यानुसार जपानी पुरुष हे महिलांना घरकामात कोणत्याही प्रकारची मदत करत नसल्याचे समोर आले आहे. स्त्री पुरुष समानता ही फक्त कार्यालयीन कामातच नसावी तर घरात देखील ती असावी आणि हेच जपानी समाजावर बिंबवण्यासाठी काही नेत्यांनी हा अनोखा पर्याय स्वीकारला आहे.
गरोदर महिला या दोन जीवांना संभाळत घरातील सगळीच कामे करतात पण काही पुरुष हे घरातील कोणत्याही कामात महिलांना मदत करत नाही, त्यामुळे १७ किलोचा प्रेगन्ससी बेल्ट पोटाभोवती बांधून या नेत्यांनी घरची कामे करायला सुरूवात केली. कोणत्याही चांगल्या कामाची सुरूवात आधी स्वत:पासून करावी म्हणूनच त्यांनी या पर्याय स्वीकारला आहे. यासाठी ‘द गव्हर्नर इज अ प्रेगन्ट वुमन’ नावाची मोहिम जपानमध्ये सुरू करण्यात आली आहे.