भारतीय समाजात लग्नाला खूप महत्त्व दिले जाते. भारतीय लग्न धुमधडाक्यात साजरी केली जाते. दरम्यान लग्नामध्ये हळद, मेहंदी, संगीत असे विविध विधी-परंपरा असतात ज्या कायम लक्षात राहतात. तुम्ही आतापर्यंत विविध पद्धतीचे लग्न पाहिले असेल पण तुम्ही कधी, नवरदेव स्वत:च्या लग्नात चक्क भाजी चिरताना पाहिले आहे का? तुम्ही आतापर्यंत नवरदेवाची म्हणजे होणाऱ्या जावयाची नेहमी चांगला पाहूणचार केला जातो असे पाहिले असेल पण सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओमधील चित्र मात्र पूर्णपणे उलट आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये पाहू शकता की, “एक नवरदेव कोबी चिरताना दिसत आहे.”

नवरदेवाला कापायला लावला कोबी
भारतात प्रत्येक राज्यात आणि प्रत्येक घरात लग्नाची वेगवेगळी पद्धत आणि विधी असतात. पण सर्वत्र एक गोष्ट सारखी असते ती म्हणजे नवरदेवाचा खास पाहूणचार. नवरीच्या घरातले लोक लग्नाच्यावेळी नवरदेवाला काय हवं नको ते पाहतात आणि त्याची विशेष काळजी घेत असतात. पण सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओ पाहून तुम्ही थक्क होऊन जाल. व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक नवरदेव खुर्चीवर बसलेला आहे आणि त्याच्याआसपास खूप भाज्या आहेत. नवरदेव स्वत: त्याच्या हातात चाकू घेऊन कोबी चिरताना दिसत आहे. हे दृश्य पाहून प्रत्येकजण थक्क झाला आहे. असे दृश्य तुम्ही कधीही पाहिले नसेल.

Shriya Pilgaonkar reacts on fake news of being adopted by parents supriya sachin Pilgaonkar hrc 97
श्रिया सुप्रिया व सचिन पिळगांवकरांची दत्तक मुलगी आहे? स्वतः उत्तर देत म्हणाली, “माझं जन्म प्रमाणपत्र…”
Loksatta vyaktivedh John Barth The Floating Opera Novel Novel writing
व्यक्तिवेध: जॉन बार्थ
a story of self confidence chaturang article
जिंकावे नि जगावेही : आपल्या माणसांचं ‘असणं’!
chaturang article dr sudhakar shelar s friendship memories and sensible female friend
माझी मैत्रीण : समंजस मैत्री

हेही वाचा – “दादांच्या जिद्दीला मानाचा मुजरा!’ चिकाटीने स्वत:चे आयुष्य जगणाऱ्या दिव्यांग व्यक्तीचा प्रेरणादायी व्हिडीओ, एकदा पाहाच

हेही वाचा – मुंबईच्या महिलांचा नादखुळा! धावत्या लोकलमध्येही केले गरबा नृत्य, पाहा हा Viral Video

हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर studentgyaan नावाच्या अकांउटवर शेअर केला आहे. व्हिडीओ नक्की कुठला आहे याबाबत कोणतीही माहिती अद्याप मिळालेली नाही. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की ,”हा कसला अत्याचार आहे?”