सोशल मीडियावर आपण अनेकदा असे अनेक व्हिडिओ पाहत असतो की, ज्यामध्ये मोठे सेलिब्रिटी फ्लाइटच्या इकॉनॉमी क्लासमधून प्रवास करत असतात आणि इतर प्रवासी त्याच्याबरोबर सेल्फी घेण्यासाठी गर्दी करत असतात. नुकतेच महेंद्रसिंग धोनीने फ्लाइटच्या इकॉनॉमी क्लासमध्ये बसून आपल्या साधेपणाने लोकांची मने जिंकली होती. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.

आपल्या देशातील लोक आपल्या आवडत्या हिरोंची देवाप्रमाणे पूजा करतात. परंतु आपल्या देशातील असे काही खरे हिरो आहेत, ज्यांचा संपूर्ण देश आदराने सलाम करतो. सध्या सोशल मीडियावर असेच एक दृश्य पाहायला मिळत आहे. ज्यामध्ये कारगिल युद्धातील एका सैनिकाचे विमानाच्या पायलटने अगदी अनोख्या पद्धतीने स्वागत केले आहे, या घटनेचा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हालादेखील अभिमान वाटेल यात शंका नाही.

हेही पाहा- भ्रष्ट अधिकाऱ्याचा विचित्र प्रताप, लाच घेताना पकडताच तोंडात कोंबल्या नोटा, बाहेर काढणाराच्या बोटाला चावला, Video व्हायरल

पायलटने कारगिल हिरोचे केले स्वागत –

व्हायरल व्हिडिओमध्ये, एक मेजर आपल्या सीटवर बसल्याचं दिसत आहेत आणि क्रू मेंबर्स आणि पायलट त्यांच्यासमोर उभे आहेत. थोड्या वेळाने पायलट घोषणा करतो तो म्हणतो, “आज एक अतिशय खास व्यक्ती आपल्याबरोबर प्रवास करत आहे. परमवीर चक्र विजेते सुभेदार मेजर संजय कुमार जी, ज्या लोकांना ‘परमवीर चक्र’ हा कोणत्या प्रकारचा पुरस्कार आहे हे माहित नाही, त्यांच्यासाठी सांगतो की, आतापर्यंत हा सन्मान देशातील फक्त २१ लोकांना देण्यात आला आहे आणि हा पुरस्कार शौर्यासाठी दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार आहे.”

व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी इंडिगो फ्लाइटचे मानले आभार –

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा सुंदर व्हिडीओ @IndiGo6E च्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, “फ्लाइंग विथ द हिरो, सुभेदार मेजर संजय कुमार जी, परमवीर चक्र” हा व्हिडीओ आतापर्यंत २ मिलियनहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर १० हजार लोकांनी तो लाईक केला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक लोक एअरलाइनच्या क्रू मेंबर्सचे कौतुक करत आहेत. कमेंट बॉक्समध्ये एका यूजरने लिहिलं, “हा व्हिडिओ पाहिल्यानंतर माझा दिवस बनला आहे.” दुसऱ्याने लिहिलं, “अशा लोकांबरोबर प्रवास करणे आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट असेल.” तर तिसर्‍याने, “देशाच्या हिरोला इतका सन्मान दिल्याबद्दल इंडिगो फ्लाइटचे मनापासून आभार.” अलं लिहिलं आहे.