सिंहाने पाणी पीत असलेल्या हरणावर केला हल्ला आणि…;बघा व्हायरल व्हिडीओ

रंबल व्हायरल नावाच्या यूट्यूब चॅनलवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओ आत्तापर्यंत ७ लाख लोकांनी बघितला आहे.

lion attack on deer
व्हायरल व्हिडीओ (फोटो: @Rumble Viral / YouTube )

शक्ती नेहमी कुशाग्र बुद्धिसमोर शरण जाते. हे स्पष्ट करणारा व्हिडीओ एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एका हरणाने आपल्या हुशारीने जंगलाच्या राजाला पराभूत केले आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, तलावाच्या कडेला पाणी पीत असलेल्या हरणावर सिंहाने अचानक हल्ला केला.

हरणाच्या कुशाग्र बुद्धीसमोर जंगलाच्या राजाची प्रत्येक चाल अपयशी ठरल्याचे व्हिडीओमध्ये दिसून येते. आपल्या कुशाग्र बुद्धीमुळे हरणाचा जीव वाचला. सोशल मीडियावर या व्हिडीओला खूप पसंती दिली जात आहे. तलावाच्या काठावर हरीण पाणी पीत असल्याचे तुम्ही पाहू शकता. असे दिसते की हरणाला हल्ला होणार आहे हे माहित आहे.

(हे ही वाचा: उडणाऱ्या हरणाला कधी बघितलं आहे का? राष्ट्रीय उद्यानातील Video Viral)

नक्की काय झालं?

व्हिडीओमध्ये दिसत आहे की, पाणी पितानाही हरिण अत्यंत सतर्क असतात. वास्तविक, हरणांना नेहमीच भीती असते की, कुठूनही शिकारी येऊन त्यावर हल्ला करू शकत नाही. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, हरिण पाणी पीत असतानाही त्याचे मन स्थिर दिसते. रंबल व्हायरल नावाच्या यूट्यूब चॅनलवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

(हे ही वाचा: भारतातलं स्वित्झर्लंड बघितलं का? बर्फाच्छादित रुळावरून धावणाऱ्या ट्रेनचा मंत्रमुग्ध करणारा Video Viral)

(हे ही वाचा: रेल्वे रुळावर बाईक चालवत होता तरुण, समोरून आली ट्रेन आणि…; बघा Viral Video)

कोणीही कुठूनही हल्ला करू शकतो ही गोष्ट त्याच्या मनात चालू होती असे दिसते. यामुळे तो पुन्हा पुन्हा डोके वर करून इकडे तिकडे पाहत असतो. तेव्हा एक भयानक सिंह अचानक त्याच्यावर हल्ला करतो. पण पूर्ण ताकदीनिशी हल्ला करूनही हरिण सिंहाच्या तावडीत आले नाही. फक्त जोरदार धूळ उठली आणि हरण धुळीत गायब झाले.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: The lion attacked the deer drinking water and see in the viral video ttg

Next Story
कडाक्याच्या थंडीपासून वाचण्यासाठी पठ्ठ्याने केला हटके जुगाड; व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनाही पडला प्रश्न
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी