पृथ्वीवरील सर्वात धोकादायक प्राण्यांमध्ये सापांचा समावेश होतो. साप पाहून माणसांबरोबरच प्राण्यांचीही अवस्था दयनीय होते. सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये मगर आणि साप अत्यंत धोकादायक मानले जातात. अजगारांबाबत बोलायचं झालं तर अजगर हे एका माणसालाही पूर्णपणे गिळू शकतात. म्हणूनच अजगरांपासून नेहमी दूर राहण्याचा सल्ला दिला जातो. याउलट सध्या सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक माणूस दोन अजगरांना खांद्यावर घेऊन दिसत आहे.

व्हिडीओ फक्त इथेच संपत नाही. दोन धोकादायक अजगरांना खांद्यावर घेऊन ती व्यक्ती असे काही करू लागते, ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. या अजगरांना खांद्यावर घेऊन ती व्यक्ती नाचू लागते हे पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. व्हिडीओ पाहून लोक म्हणत आहेत की त्या व्यक्तीने जे केले ते वेडेपणाची परिसीमा आहे. व्हिडीओ बनवण्याच्या नादात त्या व्यक्तीने एवढा मोठा धोका पत्करल्याचे लोकांचे म्हणणे आहे.

Viral Video : मुलीच्या केसांमध्ये अडकलं सापाचं पिल्लू; पुढे जे झालं ते बघून तुम्हालाही बसेल धक्का

दोन पायलट्सनी हवेतच केली विमानांची अदलाबदल अन्; घटनेचा Video Viral

व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हीही डोक्यावर हात माराल. एक माणूस दोन महाकाय अजगर खांद्यावर घेऊन नाचू लागतो हे आपण या व्हिडीओमध्ये पाहू शकतो. या व्यक्तीने तोंडावर मास्क आणि डोक्यावर टोपीही घातली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ज्याने हे दृश्य पाहिले, त्याने त्या व्यक्तीला वेडा म्हटले आहे. मात्र, हा माणूस दोन्ही भयानक अजगरांसोबत खेळताना दिसत आहे. सहसा असे दृश्य तुम्ही कधीही पाहिले नसेल. world_of_snakes नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ अपलोड करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून एका युजरने लिहिले की, ‘असे दिसते की ती व्यक्ती त्याच्या आयुष्याला कंटाळली आहे.’