रस्त्यावरून जाताना दुचाकीने प्रवास करताना डोक्यावर हेल्मेट घालणे अत्यंत गरजेचं आहे. हेल्मेट वाहनचालकाच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. हेल्मेट घातले नाही तर दुचाकी चालकांना दंड भरावा लागतो. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात दोन तरुण दुचाकीवरून येत असतात आणि चालकाने हेल्मेट घातलेले नसते. हे पाहून पोलिस तरुणांना अगदीच वेगळ्या पद्धतीत धडा शिकवताना दिसले, जे पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही.
व्हायरल व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, रस्त्याकडेला समोर एक पोलिस अधिकारी उभे असतात, तर दोन मित्र दुचाकीवरून येत असतात. दुचाकी चालवणाऱ्या तरुणाने हेल्मेट घातलेले नसते, तर त्याच्या मागे बसलेल्या मित्राने हेल्मेट घातलेले असते. पोलिसांना पाहून आपल्या मित्राला दंड भरण्यापासून वाचवण्यासाठी तो स्वतःच्या डोक्यावरील हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्या मित्राच्या डोक्यात घालतो. तर समोर उभा असणारा पोलिस अधिकारी हे पाहतो आणि मजेशीर गोष्ट करतो. पोलिस अधिकाऱ्याने तरुणांसोबत कोणती मजेशीर गोष्ट केली एकदा तुम्हीसुद्धा व्हिडीओतून बघा.
हेही वाचा…काय सांगता! विजेचा वापर न करता शाळकरी मुलानं बनवली वॉशिंग मशीन; जुगाड VIDEO पाहून सर्वच झाले थक्क
व्हिडीओ नक्की बघा :
व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, मित्राला वाचवण्यासाठी दुचाकीवर मागे बसलेला मित्र लगेच आपलं हेल्मेट काढून दुचाकी चालकाच्या डोक्यात घालतो, हे पाहून पोलिस अधिकारी कॉमेंट्री करण्यास सुरुवात करतात आणि म्हणतात की, ‘आणि अशाप्रकारे अगदीच वेगात मागे असणारे हेल्मेट मित्राच्या डोक्यावर ठेवण्यात आले आहे. तसेच आता वेगात कारवाईसुद्धा केली जाईल’, अशी मजेशीर लाईव्ह कॉमेंट्री पोलिस अधिकारी हिंदी भाषेत करतात. हे ऐकून आजूबाजूचे प्रवासी आणि दुचाकीवर बसलेले दोन्ही मित्रदेखील हसायला लागतात.
अगदी क्रिकेट खेळात जशी कॉमेंट्री करण्यात येते, तशीच कॉमेंट्री पोलिस अधिकारी करताना दिसून आले आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडीओ @bhagvatprasadpandey यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. भागवत प्रसाद पांडे असे पोलिस अधिकारी यांचे नाव आहे. या इन्स्टाग्राम अकाउंटवर त्यांनी अनेक व्हिडीओ बनवून पोस्ट केले आहेत. तसेच हा व्हिडीओ पाहून तरुणांना धडा शिकवण्याची अनोखी स्टाईल अनेकांना आवडली आहे; असे ते आवर्जून कमेंटमध्ये सांगताना दिसून आले आहेत.