उत्तर प्रदेश पोलीस सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. अशातच आता मेरठमधील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका पोलिसाने सर्वांसमोर एका तरुणाला गोळ्या घालण्याची धमकी दिल्याचं पाहायला मिळत आहे. व्हिडीओमध्ये एक तरुण पोलिसांशी वाद घालताना दिसत आहे, यावेळी रागाच्या भरात इन्स्पेक्टर तरुणाला, “तुला इथेच मारेन, एक मिनिटही लागणार नाही.” असं म्हणताना दिसत आहे. कँट बोर्डाची टीम एक मोडकळीस आलेले घर पाडण्यासाठी आली होती, यावेळी हा तरुण विरोध करत होता असं सांगण्यात येत आहे.

जुने घर पाडण्यासाठी आली होती टीम –

मिळालेल्या माहितीनुसार, कँट बोर्डाची एक टीम जीर्ण झालेले जुने घर पाडण्यासाठी आली होती. यावेळी व्हिडीओतील तरुणांने त्यांना विरोध केला, याची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर इन्स्पेक्टर स्वतः घटनास्थळी पोहोचले. यादरम्यान टीमवर चिडलेल्या तरुणाने पोलिसांबरोबरही गैरवर्तन केल्याचं सांगितलं जात आहे. यावेळी इन्स्पेक्टर लोकांना समजावण्याचा प्रयत्न केला तरी तरुण ऐकत नव्हता. त्यामुळे इन्स्पेक्टर भडकले आणि त्यांनी ते तेथील लोकांना म्हणाले, “याला इथून घेऊन जा, नाहीतर त्याला मारायला एक मिनिटही लागणार नाही.” इन्स्पेक्टरचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोकांनी मेरठ पोलिसांवर प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली. पोलिसाने गोळी मारण्याची धमकी दिल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

हेही पाहा- शिक्षकाचा विचित्र प्रताप! शाळा सुरु असताना विद्यार्थ्याला काढायला लावल्या उवा, संतापजनक Video व्हायरल

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया –

पोलिसांचा हा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकरी त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. पियुष रायने व्हिडिओ शेअर करत लिहिलं, “उत्तर प्रदेश पोलिसांचा कोणता उपनिरीक्षक आहे जो मारण्याची धमकी देत ​​आहे? मेरठमध्ये इन्स्पेक्टर पदावर आहे. कमरेला असलेली पिस्तुल एक दिवस रक्ताशी सौदा करेल असे त्याच्या बोलण्यातून दिसतं आहे.” तर आणखी एकाने लिहिलं “बाजारात ‘ठोक’ नावाचे कोणतेही नवीन चॉकलेट आहे का? आणि पोलीस ते मुलाला का देऊ इच्छितात? व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एसएसपींनी चौकशीचे आदेश दिले आहेत. त्याचवेळी घर पाडण्यासाठी पोहोचलेल्या कँट बोर्डाच्या पथकानेही व्हिडीओतील तरुणाविरुद्ध अश्लील वर्तनासह सरकारी कामात अडथळा आणल्याचा आरोप केला आहे.